Marathi News> भारत
Advertisement

सप्तपदीपूर्वीच वराने मंडपातून ठोकली धूम, वधूला गोष्ट कळताच सर्व झाले थक्क

मंडप सजलं होतं, बँड बाजा वाजत होता, वऱ्हाडी नाचत होते, सप्तपदीसाठी वधू वर मंडपात आले अन् तेवढ्याच एक फोन आला वराने मंडपातून पळ काढला. फोनवर असं काय कळलं की ज्यानंतर वधूला सोडून वराने पळ काढला काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.   

सप्तपदीपूर्वीच वराने मंडपातून ठोकली धूम, वधूला गोष्ट कळताच सर्व झाले थक्क

जयपूरमधील पंचतारांकित हॉटेल लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. बँडच्या तालावर वऱ्हाडी नाचत होते. मंडपात पंडीत लग्नासाठी मंत्र म्हणत होते, वधू वर सप्तपदीसाठी आले अन् तेवढ्यात वराला फोन आला. त्यानंतर वधूला मंडपात सोडून वराने धूम ठोकला. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वराच्या शोधात होते. कारण  प्रसिद्ध महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील सौरभ आहुजा म्हणजेच हा वर होता. 

मिळालेल्या माहितीनुसार ईडीला कळलं होतं की आरोपी सौरभ गुप्तपणे लग्न करत आहे. ही माहिती मिळतातच त्याला पकडण्यासाठी ईडीने योजना आखली. लग्नाच्या दिवशी छापा टाकून सौरभ आहुजाला पकडण्याच ठरलं. ईडीला लग्नाच्या विधींनंतर सौरभ आहुजा यांना पकडायचे होते पण सौरभला ईडीच्या योजनेबद्दल कळलं. अशा ईडीच्या तावडीत सापडण्यापूर्वी सौरभ मध्येच मंडपातून वधूला सोडून पळून गेला. लग्नाच्या विधींपूर्वी सौरभ पळून गेल्याने त्याची वधू आणि इतर पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि त्यांना नेमकं काय घडलं याबद्दल काही समजत नव्हतं. पण ईडीने लग्नाला आलेल्या त्याच प्रकरणातील आरोपी प्रणवेंद्रसह तीन जणांना पकडताच सर्वांना या प्रकरणाची माहिती समजली आणि सौरभबद्दल सगळं त्यांच्या समोर आलं. यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी वधूचीही चौकशी केली पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. एवढंच नाही तर ईडीने वधू आणि वर दोघांच्याही कुटुंबांकडून माहिती गोळा केली असून ते सौरभच्या शोधात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या महादेव बेटिंग अॅपद्वारे कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहारासंदर्भात रायपूर अंमलबजावणी संचालनालयाचे पथक जयपूरला पोहोचले होते. जिथे त्यांनी आरोपी सौरभ आहुजा याला पकडण्यासाठी छापा टाकला, पण ईडी अधिकाऱ्यांना चकवा देऊन वॉन्टेड आरोपीने मंडपातून पळ काढला.

खरं तर, भोपाळचा रहिवासी असलेल्या आरोपी सौरभ आहुजाच्या कुटुंबाने दुबईतील रायपूरमधील मुख्य आरोपीच्या लग्नाच्या पार्टीसाठी विमान बुक करण्यात भूमिका बजावली. त्यानंतर रायपूर ईडीची टीम सौरभ आहुजाच्या मागे लागली. पण जेव्हा ईडीला माहिती मिळाली की सौरभ स्वतःच्या लग्नासाठी जयपूरला पोहोचला आहे, तेव्हा ईडीचे अधिकारीही त्याच्या मागे लागले. यानंतर ईडीचे अधिकारी पूर्ण तयारीने आहुजा कुटुंब जिथे राहत होते तिथे हॉटेलमध्ये पोहोचले. पण तरीही सौरभने ईडी अधिकाऱ्यांना चकवा दिला. पण ईडीने इतर 3 आरोपींना अटक केली असून त्यांना विमानाने रायपूरला आणलं आहे. 

Read More