MLA Expose Bad Road Work: रस्त्यांची परिस्थिती आणि रस्ते बांधताना होणारा भ्रष्टाचार ही भारतामधील कोणत्याही राज्यामध्ये जवळजवळ 12 ही महिने चर्चेचा विषय असतो. उत्तर प्रदेशमधील गाजीपुरमधील जखनिया विधानसभा मतदारसंघामधील आमदारानेच एका ठेकेदाराची पोलखोल केली आहे. कशाप्रकारे भ्रष्टाचारामुळे ठेकेदार जनतेच्या पैशांमधून लोकांची आणि सर्वांचीच फसवणूक करत आहेत याचा पर्दाफाश केला आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे आमदार बेदी राम यांनी गाजीपुरमधील जंगीपुरवरुन युसुफपुरला जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे याबद्दलची पोलखोल केली असून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बेदी राम यांनी ज्या रस्त्याचं काम सुरु आहे तिथे केवळ एक लाथ मारली आणि रस्त्यावर टाकलेलं डंबर उडाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आमदारा ठेकेदाराला ओरडत असतानाही दिसत आहे. असा रस्ता बनवतात का? या रस्त्यावर गाड्या कशा चालतील? असा जाब बेदी राम या ठेकेदाराला विचारताना दिसत आहेत. रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात असल्याची तक्रार बेदी राम यांना मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणाची पाहाणी करण्यासाठी बेदी राम पोहोचले होते. बेदी राम या डांबरीकरण सुरु असलेल्या रस्त्यावर पोहोचले आणि त्यांनी नव्याने भर टाकलेल्या रस्त्यावर एक लाथ मारली तर टाकलेली सर्व खडी आणि डांबर उडालं.
आपल्या एका लाथेनं डांबर आणि खडी उडत असल्याचं पाहून आमदाराने ठेकेदाराला दम भरला. "हा रस्ता आहे का? याला रस्ता म्हणणार का? या रस्त्यावर गाड्या धावणार का? ही काय मस्करी लावली आहे तुम्ही?" असं बेदी राम यांनी ठेकेदाराला जबाब विचाराताना म्हटलं. 5 दिवसांपूर्वीच या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही साधी लाथ मारली तरी त्यावरील डांबर आणि खडी निघत असल्याने जास्त वजनाच्या गाड्या या रस्त्यावरुन कशा जाणार हा प्रश्न येथील आमदारानेच ठेकेदाराला विचारल्याचं व्हिडीओत दिसून आलं.
@ACOUPPolice
— Sanjay Singh (@SANJAYK98610543) March 30, 2023
Corruption in road construction
Jakhiniya Ghazipur UP pic.twitter.com/d9bT5rP4BX
जंगीपुर-बहरियाबाद-यूसुफपूर या 4.5 किमी लांबीच्या मार्गावर हे काम सुरु होतं. आपण या प्रकरणी तेथील ठेकेदाराला जाब विचारण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. मी त्यांना घडलेला प्रकार सांगताना, अशाप्रकारे रस्ता बनवला तर तो एक वर्ष काय 6 महिनेही टिकणार नाही, असंही सांगितल्याच बेदी राम म्हणाले.