Jammu Airport Attack latest News in Marathi: आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू प्रदेशातील अनेक ठिकाणी जोरदार गोळीबार सुरू आहे. पूंछ, राजौरी, अखनूर या ठिकाणी जोरदार गोळीबार सुरु आहे. पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवताना दिसत नाहीय. जम्मूमधील विमानतळावर पाकिस्तानने हल्ला केल्याची ताजी माहिती समोर आली आहे. जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. 8 - 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले आहेत. भारतीय सैन्याने त्यांचे हल्ले हाणून पाडले आहेत. जम्मूमध्ये सायलनचा आवाज ऐकू येत आहे. शिवाय संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॉकआउट करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, वैष्णोदेवीमध्येही ब्लॅकआउट करण्यात आले आहे. जम्मूमध्ये एकाच वेळी अनेक ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले आहेत. भारतीय सैनिकांनी पुन्हा एकदा पाकिस्तानाचा मुसक्या आवळल्या आहेत. भारतीय सैनिकांनी धडाकेबाज कामगिरी करत पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडला आहे. भारतीय सैनिकांने पाकिस्तानचे ड्रोन आकाशातच उडवून लावले आहेत. आताची मोठी अपडेट समोर आली आहे, जम्मू विमानतळावर पाकिस्तानचे 16 ड्रोन भारतीय सैनिकांनी हाणून पाडले आहे. भारताचे लढाऊ विमानांनी आकाशात झेप घेतली आहे. राजस्थानात पाकिस्तानचे एफ - 16 विमान पाडलं. बिकानेर, वैष्णवदेवी, अमृतसरमध्ये ब्लाकआउट करण्यात आला आहे.
पठाणकोटमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. रियासीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
#WATCH | Sirens being heard in Akhnoor, Jammu and Kashmir
— ANI (@ANI) May 8, 2025
More details awaited. pic.twitter.com/eiGdyj14Tq
याशिवाय, गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील रहीम यार खान आणि बहावलपूर येथून भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी लष्कराचे टँक वेगाने तैनात केले जात आहेत आणि मोठ्या संख्येने टँक सीमेकडे हलवले जात आहेत. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे.
भारताच्या एस-400 ने 8 पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडली आहेत. सांबा येथे पाकिस्तानने जोरदार गोळीबार केला आहे. जम्मूतील आरएस पुरा भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे, येथे सायरन वाजत आहेत. जम्मू शहरात मोबाईल नेटवर्क काम करत नाहीत. सतवारी कॅम्पवर हल्ला झाल्याची बातमी आहे. दुसरीकडे, कुपवाडामध्येही जोरदार गोळीबार झाला आहे. यासोबतच पंजाबमधील गुरुदासपूरमध्येही ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पठाणकोट एअरवेजवरही सायरन वाजत आहेत. पठाणकोटच्या सुजानपूर मतदारसंघात एक ड्रोन दिसला, त्यानंतर लष्कराने ड्रोनवर गोळीबार केला.
7-8 मे 2025 च्या रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे लुधियाना, चंदीगड आणि अमृतसरसह भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताने हा प्रयत्न निष्प्रभ केला होता.