Marathi News> भारत
Advertisement

पुलवामा चकमक : सैन्यातून पळून जाऊन दहशतवाद्यांना मिळालेल्या जवानाचा खात्मा

राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूर ठोकरचंही नाव होतं

पुलवामा चकमक : सैन्यातून पळून जाऊन दहशतवाद्यांना मिळालेल्या जवानाचा खात्मा

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलंय. हे तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित आहेत. चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय. राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूरचंही नाव होतं. जवानांनी जहूर ठोकरचा खात्मा करून मोठं यश मिळवलंय. 

परंतु, या चकमकीत सुरक्षादलाचा एक जवान शहीद आणि दोन जवान जखमी झाल्याची माहिती हाती येतेय. एन्काऊंटर दरम्यान स्थानिकांकडून सुरक्षादलावर दगडफेक करण्यात आली... त्यानंतर सुरक्षादलानं केलेल्या गोळीबारात ७ नागरिक ठार झाल्याचं समजतंय.

जम्मू-काश्मीर पोली, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त टीमनं हे एन्काऊंटर केल्याचं समोर येतेय. पुलवामा जिल्ह्यातील खारपारो भागातील सिरनूमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाच्या हाती लागली होती. त्यानंतर सेना आणि सीआरपीएफच्या टीमनं स्थानिक पोलिसांसोबत या भागाला घेरलं.

ठार झालेले तीनही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी निगडीत असल्याचं समजतंय. या एन्काऊंटरमध्ये ठार झालेला जहूर ठोकर 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवादी असल्याचं सांगण्यात येतंय. सुरक्षेची खबरदारी म्हणून भागातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आलीय. 

fallbacks
जहूर ठोकर 

कोण आहे जहूर ठोकर

जुलै २०१७ मध्ये कॉन्स्टेबल जहूर ठोकर जम्मू - काश्मीरच्या सेनेच्या कॅम्पमधून हत्यारांसहीत फरार झाला होता. जहूर पुलवामामध्ये टेरिटोरियल आर्मीचा जवान होता. जहूर एके-४७ आणि जवळपास तीन मॅगझीन घेऊन फरार झाला होता. बारामुल्लाच्या गंटमुला स्थित कॅम्पमध्ये हा प्रकार घडला होता. जहूर दहशतवादी संघटनेत सहभागी होऊ शकतो, अशी कुणकुण सेनेला तेव्हाच लागली होती.

Read More