Marathi News> भारत
Advertisement

अनंतनागमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू, इंटरनेट बंद

 चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस, सेना आणि सीआरपीएफचे जवान सहभागी आहेत 

अनंतनागमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू, इंटरनेट बंद

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी सकाळीच सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झालीय. ही चकमक अनंतनागच्या मुनवार्ड भागात सुरू आहे. सुरक्षादलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. इथल्या एका घरात हे दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस, सेना आणि सीआरपीएफचे जवान सहभागी आहेत. 

सुरक्षादलानं संपूर्ण भागालाच वेढा घातलाय. सर्च ऑपरेशन सुरू आहे... आणि दोन्ही बाजुंकडून फायरिंग सुरू आहे. दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ नागरिकांकडून दगडफेक होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे सुरक्षादलानं तातडीनं अनंतनाग जिल्ह्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केलीय. 

Read More