Marathi News> भारत
Advertisement

आपल्याच रायफलमधून डोक्यात गोळ्या घालून जवानाची आत्महत्या

पनामा चौकमध्ये एका ट्रान्झिट कॅम्पमध्ये ही घटना घडलीय

आपल्याच रायफलमधून डोक्यात गोळ्या घालून जवानाची आत्महत्या

जम्मू : जम्मूच्या सेवा शिबिरात एका सैनिकानं आपल्याच रायफलमधून स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केलीय. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या सैनिकाचं नाव संदीप सिंह असं आहे. ते मूळचे पंजाबचे रहिवासी होते. पनामा चौकमध्ये एका ट्रान्झिट कॅम्पमध्ये एका चौकीवर ते तैनात होते. 

गोळीचा आवाज ऐकल्यानंतर कॅम्पमधील उपस्थित घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संदीप सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना आढळले. संदीप सिंह यांनी आपल्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर संदीप यांचा मृतदेह सेनेकडे सोपवण्यात आलाय.  

संदीप सिंह यांच्या आत्महत्येमागचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Read More