Marathi News> भारत
Advertisement

कोरोनामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द

आता मात्र चित्र बऱ्याच अंशी बदललेलं आहे... 

कोरोनामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द

नवी दिल्ली : कोरोना Coronavirus विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी विविध धार्मिक स्थळांवर आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक यात्रांवर याचे थेट पडसाद दिसून येऊ लागले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार यंदाच्या वर्षी आयोजित केली जाणारी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. 

अमरनाथ श्राइन बोर्डातर्फे २३ जूनपासून ही यात्रा आयोजित करण्यात येणार होती. पण, आता मात्र चित्र बऱ्याच अंशी बदललेलं असेल. यात्रा सुरु होण्यापूर्वीच रद्द करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुधवारी जम्मूतील राजभवन येथे झालेल्या एका अतिशय महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेतला गेला. लेफ्टनंट गवर्नर गिरिशचंद्र मुर्मू यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

 

उपराज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मीरच्या खोऱ्यात जवळपास ७७ रेड झोन आहेत. ज्या ठिकाणहूनच यात्रेची वाट पुढे जाते. परिणामी या विषाणूच्या पार्श्वभूमीवर चिंतेच्या या वातावरणात लंगर, प्रथमोपचार केंद्र, शिबीरांची स्थापना आणि सामानाची जमवाजमव कठीण आहे. ज्या कारणास्तव यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी अमरनाथ धाम येथे जाणाऱ्या श्रद्धाळूंचा हिरमोड झाला आहे. 

 

Read More