Marathi News> भारत
Advertisement

पुँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेकदा सीमारेषेचं उल्लंघन करण्यात आलंय

पुँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची 'नापाक' कृत्यं काही थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजुनं पुँछ जिल्ह्यात सीमारेषेचं उल्लंघन करण्यात आलं. याला भारतीय सेनेनं योग्य ते प्रत्यूत्तर दिलं. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्याच्या दरम्यान पाकिस्तानच्या बाजुनं पुँछमध्ये लाईन ऑफ कंट्रोल (LOC) पार करून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानंही गोळीबारानं प्रत्यूत्तर दिलं. 

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेकदा सीमारेषेचं उल्लंघन करण्यात येतंय. हा प्रकार दोन महिन्यानंतरही सुरूच आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेलेत. 

Read More