Marathi News> भारत
Advertisement

जम्मू-काश्मीर : सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

लश्कर-ए-तोयबाच्या एका प्रमुखासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा...

जम्मू-काश्मीर : सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलासोबत झालेल्या दोन वेग-वेगळ्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या एका प्रमुखासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एक दहशतवादी शपियांमध्ये मारला गेला. तर दोन दहशतवाद्यांना कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत मारण्यात आलं. 

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शोपियांच्या चित्रगाम गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षादलाने त्या भागात घेराबंदी आणि शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आणि त्यानंतर चकमक सुरु झाली. त्यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. चकमक झालेल्या ठिकाणाहून पिस्तुल, हँड ग्रेनेड्स सापडले असून ते नष्ट करण्यात आले आहेत.

याचदरम्यान, दुसरीकडे उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यापैकी एक 18 एप्रिल रोजी सोपोरमध्ये झालेल्या सीआरपीएफच्या तीन जवानांच्या हत्येत सामिल होता. तर 4 मे रोजी हंदवाडामध्ये सीआरपीएफच्या 3 जवानांची हत्या झाली होती. त्यातही तो सामिल होता. 

 

Read More