Marathi News> भारत
Advertisement

'ते डोकं वापरतायत, मग तुम्ही कशाला...', जावेद अख्तर यांनी सद्गगुरुंना तोंडावरच सुनावलं, म्हणाले 'श्रद्धा आणि मूर्खपणा...'

सद्गगुरु जग्गी वासुदेव आणि जावेद अख्तर काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात आमने-सामने आले होते. यादरम्यान त्यांच्यात चर्चा रंगली होती.   

'ते डोकं वापरतायत, मग तुम्ही कशाला...', जावेद अख्तर यांनी सद्गगुरुंना तोंडावरच सुनावलं, म्हणाले 'श्रद्धा आणि मूर्खपणा...'

आध्यात्मिक गुरु सद्गगुरु जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) आणि लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त आमने-सामने आले होते. यादरम्यान दोघांमध्ये वाद-विवाद रंगला होता. या चर्चेत सद्गगुरु यांनी जावेद अख्तर यांच्यावर मेंदूचा वापर न करण्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे जावेद अख्तर यांनी सद्गगुरुंवर त्यांच्या 'धोकादायक खेळांनी' निष्पाप लोकांची मनं वळवल्याचा आरोप केला होता. त्यांनी 'श्रद्धा' आणि 'विश्वास' यातील फरक अधोरेखित केला आणि असंही म्हटलं की, ते कधीही अशा आध्यात्मिक गुरूंना भेटले नाहीत ज्याला ते गांभीर्याने घेऊ शकतील. मानवाची पाच इंद्रियं 'विश्वसनीय नाहीत' हा सद्गगुरुंचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

या परिषदेत जावेद अख्तर म्हणाले की, "अध्यात्मवादी सर्वात प्रथम पाच इंद्रियांवरचा तुमचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करतील. असं केल्यावरच ते तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकतील. आता, जर तुम्हाला खरोखरच हे पटत असेल तर तुम्ही शस्त्रक्रिया करून तुमचा मेंदू का काढून टाकत नाही? त्यानंतर व्यक्तिमत्व कसं वाढवलं जातं हे पाहूयात. जो काही विस्तार होतो तो तुमच्या मनात होतो. तुम्ही ते कमी करू शकत नाही. आणि जो कोणी असं सुचवतो की ते कमी केले जाऊ शकते तो तुमच्याशी धोकादायक खेळ खेळत आहे."

यादरम्यान दोघांमध्ये श्रद्धा विषयावर तुफान वादावादी झाली. "कारण, तर्क, पुरावे, साक्ष नसलेली कोणतीही गोष्ट म्हणजे श्रद्धा. मला कधीकधीत प्रश्न पडतो की, श्रद्धा आणि मूर्खपणामध्ये काय फरक आहे, कारण मूर्खपणाची व्याख्या एकच आहे. मी 'श्रद्धा' स्वीकारण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी तर्क असणं आवश्यक आहे", असं जावेद अख्तर म्हणाले. 

त्यावर उत्तर देताना सद्गगुरुंनी सांगितलं की, "हे ज्या पद्धतीने सुरु आहे, ते एका विशिष्ट विचारातून येत आहे. जेव्हा मी गेल्या वेळी जावेद साहेबांना भेटलो होतो, तेव्हा ते मला सांगत होते की एका गुरुने त्यांना त्यांचं डोकं वापरु नका असं सांगितलं होतं. मला माहित नाही की कोणत्या गुरूंनी हे सांगितलं आहे, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांनी सल्ला गांभीर्याने घेतला गेला आहे." त्यावर जावेदने अख्तर म्हणाले, "मी तुम्हाला वचन देतो गुरुजी, मी कधीही कोणत्याही गुरूला गांभीर्याने घेतलेलं नाही."

मिड-डे ला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत, त्यांनी सद्गुरूंसोबतच्या त्यांच्या वादावर भाष्य केलं आणि मानवी अस्तित्वाच्या कारणाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांची खिल्ली उडवली. जावेद अख्तर म्हणाले, "हा होमो सेपियन्सनी विचारलेला एक भडक प्रश्न आहे. त्याचा काहीही अर्थ नाही. तुम्ही गवताच्या पात्यासारखे निरर्थक आहात. तुम्ही मुंगीबद्दल, झुरळाबद्दल, डासाबद्दल असं कधीही म्हणणार नाही. तुम्ही तेच आहात, फक्त थोडे मोठे आहात. अब्जावधी वर्षे जुन्या या विश्वात, आपण 70-80 वर्षांत मरतो. आपण काहीच नाही."

About the Author

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहे. 2009 मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आपल्या करिअरला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत मीडियामध्ये 16 वर्षांचा अनुभव घेतला आहे. फोटोकॉर्... Read more

Read More