Marathi News> भारत
Advertisement

जावेद अख्तर यांनी ओवेसींना चांगलंच फटकारलं

मुलं होत नसतील तर तुम्ही ५ हजारांचे पान खा, असा अजब आणि खालच्या स्तरावरील सल्ला देणाऱ्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी चांगलेच फटकारलेय.

जावेद अख्तर यांनी ओवेसींना चांगलंच फटकारलं

मुंबई : मुलं होत नसतील तर तुम्ही ५ हजारांचे पान खा, असा अजब आणि खालच्या स्तरावरील सल्ला देणाऱ्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी चांगलेच फटकारलेय.

ओवेसी यांनी वादग्रस्त विधान केल्याने देशभरात तीव्र आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही काळापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ओवेसी यांनी हिंदूंना मुलं होतं नसतील तर औरंगाबाद येथील एक विशिष्ट पान खाण्याचा सल्ला दिला होता. त्यावरु अख्तर यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून चांगलेच  झापलंय.

'ओवेसी साहेब, मी तुमच्या तोंडून या शब्दांची अपेक्षा केली नव्हती. तुम्ही सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि तुमच्या या वागणुकीने मी त्रासलो आहे. तुम्हाला स्वतःची लाज वाटायला हवी', अशा खरमरीत भाषेत ट्विट जावेद अख्तर यांनी केलेय.

ओवेसी यांनी विश्व हिंदू परिषदेवर अश्लील टीका केली होती. हिंदूंना मुलं होत नसतील त्यांनी पाच हजार रुपये किमतीचं एक पान खाण्याचं सल्ला दिला. ते एवढ्यावर न थांबता मुस्लिमांना या पानाची गरज नसून आमची लोकसंख्याच सगळं काही सांगत आहे, अशी गरळही ओकली.

About the Author
Read More