Marathi News> भारत
Advertisement

सपाच्या दिग्गज नेत्याचा पत्ता कट, जया बच्चन जाणार राज्यसभेवर

उत्तर प्रदेशच्या 10 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल आणि किरणमय नंदा यांचा राज्यसभेचा पत्ता कट होऊ शकतो. 

सपाच्या दिग्गज नेत्याचा पत्ता कट, जया बच्चन जाणार राज्यसभेवर

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या 10 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल आणि किरणमय नंदा यांचा राज्यसभेचा पत्ता कट होऊ शकतो. 

सपाने त्यांच्या दिग्गज नेत्याला बाजुला करत जया बच्चन यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्य़ाचा निर्णय घेतला आहे.

सपाचे नरेश अग्रवाल, किरणमय नंदा आणि जया बच्चन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सपाकडे फक्त 47 मतं आहेत. पक्ष फक्त एकाच उमेदवाराला राज्यसभेत पाठवू शकते. बाकीचे मतं सपा बसपाच्या उमेदवाराला देईल.

नरेश अग्रवाल आणि किरणमय नंदा यांना राज्यसभेचं तिकीट नाही देण्यात आलं आहे. सपाने त्यांच्या 3 पैकी फक्त एकच उमेदवाराला राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More