Marathi News> भारत
Advertisement

खड्ड्यात पडलेल्या कारसाठी JCBची मदत घेणं पडलं महागात... पाहा व्हिडीओ

खड्ड्यात जाणं म्हणतात ते हेच का?  कार सोबत जेसीबीही गेला... पाहा रेस्क्यूचा व्हिडीओ

खड्ड्यात पडलेल्या कारसाठी JCBची मदत घेणं पडलं महागात... पाहा व्हिडीओ

मुंबई: आयुष्यात असे काही प्रसंग येतात जिथे मदत करायला हात पुढे केला तर आपणच फसल्यासारखं होतं किंवा याची मदत का घेतली असा पश्चाताप करण्याची वेळ येते. आयुष्यात कधी कधी असे काही प्रसंग घडतात जिथे हसावं की रडावं देखील त्या क्षणी आपल्याला सुचत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन जण आपली खड्ड्यात गेलेली गाडी काढण्य़ासाठी मदत मागत असतात. एक जेसीबी त्यांना ही गाडी काढण्यासाठी मदत करायला येतो. हा जेसीबी या कारला बाहेर काढण्याची पूर्ण तयारी करतो. कारला बांधलं जातं आणि टो करून कारला बाहेर काढणार तेवढ्यात दुर्घटना घडते. 

कारला जेसीबीने बाहेर काढण्याऐवजी जेसीबीच उलटा खड्ड्यात पडतो. त्यामुळे कारचं नुकसान होतं. कारला खड्ड्यातून बाहेर काढायचं राहिलं बाजूलाच पण त्याचं नुकसान होतं ते वेगळंच. म्हणजे पश्चाताप करण्याची वेळ येते ती वेगळीच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. 381.1 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहून लोकांना हसूच आवरलं नाही. दुसरा युझर म्हणाला की याच जेसीबीला बाहेर काढण्यासाठी आता क्रेन बोलवावी लागेल. तर काही जणांनी या व्हिडीओवर हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. एकूणच कार चालकाला या जेसीबीची मदत चांगलीच महागात पडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Read More