Marathi News> भारत
Advertisement

झारखंडमध्ये पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान; एक जवान शहीद

चार जवान जखमी....

झारखंडमध्ये पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान; एक जवान शहीद

झारखंड : रविवारी सकाळी झारखंड येथील डुमका येथे सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका जवानाचा जीव गमवावा लागला. तर, चार ते पाच जवान यात जखमी झाले. 

डुमका येखील राणेश्वर ठाणे हद्दीत असणाऱ्या कठलियापाशी ही चकमक झाल्याची माहीती समोर येत आहे. रानेश्वर आणि शिकारीपाडा येथे असणाऱ्या हद्दीत जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली ज्या आधारावर या परिसराचत लगेचच शोधमोहिम सुरु करण्यात आली. याच कारवाईदरम्यान, नक्षलवाद्यांनी जनावांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराचं प्रत्युत्तर म्हणून संरक्षण दलाकडूनही गोळीबार करण्यात आला. याच कारवाईदरम्यान एका जवानाला वीरमरण आलं. तर, चार जवान जखमी झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या कारवाईच जवळपास चार ते पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून, संबंधित परिसरात अद्यापही शोधमोहिम सुरूच असल्याचं कळत आहे. 

Read More