Marathi News> भारत
Advertisement

Tata Group Stocks : झुनझुनवाला यांच्या पत्नीची 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई; TATA ग्रुपच्या दोन कंपन्यांची कमाल!

Rekha Jhunjhunwala: झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा ग्रुपच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. टाटा ग्रुपच्या शेअर्सचा  रेखा  झुनझुनवाला यांना जबरदस्त फायदा झाला आहे. टाटयटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स वधारले. यामुळे  रेखा  झुनझुनवाला यांनी अवघ्या 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई केली.

Tata Group Stocks :  झुनझुनवाला यांच्या पत्नीची 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई; TATA ग्रुपच्या दोन कंपन्यांची कमाल!

Tata Group Stocks : आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात वेगळीच तेजी पहायला मिळाली. ट्रेडिंग सुरु होताच झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा  झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांची 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई झाली.  TATA ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअरमुळे झुनझुनवाला यांनी मोठा नफा मिळवला आहे. सोमवारी बाजार उघडताच टायटनच्या शेअरचा रेट 50.25 रुपयांनी वाढून 2,598.70 रुपयांवर पोहोचला. 

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा ग्रुपच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. टाटा ग्रुपच्या शेअर्सचा  रेखा  झुनझुनवाला यांना जबरदस्त फायदा झाला आहे. टाटयटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स वधारले. यामुळे  रेखा  झुनझुनवाला यांनी अवघ्या 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई केली.

सोमवारी बाजार खुलताच टाइटनच्या शेयरचा रेट 50.25 रुपयांनी वधारला. हा रेट थेट 2,598.70 रुपयांवर पोहचला. तर, दुसरीकडे टाटा मोटर्सचे शेअर्सच देखील चांगलेच वधारले. टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 32.75 रुपयांनी वाढून 15 मिनिटांत 470.40 रुपयांवर पोहचली. टाटा समूहाच्या या दोन शेअर्सनी चांगलीच उसळी घेतली. यामुळे रेखा झुनझुनवाला यांच्या नेट वर्थमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.15 मिनिटांत सुमारे 400 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

टायटनमुळे 230 कोटींची कमाई

सोमवारी शेअर बाजार सुरू होताच 15 मिनिटांत टायटनच्या शेअरच्या किमतीत प्रति शेअर 50.25 रुपयांची वाढ झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीतील टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,58,95,970 शेअर्स आहेत. पहिल्या 15 मिनिटांत टायटनच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत सोमवारी 230 कोटी रुपयांची (50.25 x 4,58,95,970 रुपये) वाढ झाली आहे.

टाटा मोटर्सची 170 कोटींची कमाई 

शेअर बाजार सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत टाटा मोटर्सच्या शेअरचे दर  प्रति शेअर 32.75 ने वधारले. आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत Tata Motors Ltd च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांची शेअरहोल्डिंग 5,22,56,000 म्हणजेच कंपनीतील 1.57 टक्के हिस्सेदारी आहे. शेअर बाजारात उसळी आल्याने रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत सुमारे 170 कोटी रुपयांची (32.75 x 5,22,56,000 रुपये) वाढ झाली आहे.

रेखा झुनझुनवाला यांच्या कमाईत 400 कोटींची वाढ 

रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एकूण 400 कोटींची वाढ झाली आहे. टायटन कंपनीच्या शेअरच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे झुनझुनवाला यांना 230 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर 170 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या दोन टाटा समूहांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत 400 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

 

Read More