Marathi News> भारत
Advertisement

तरुणाईला जॅकपॉट! केंद्र सरकारकडून... नोकरीसंदर्भातील सर्वात मोठी, निश्चिंत करणारी बातमी

Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी किंवा नोकरी टिकून राहील की नाही अशी चिंता सतावणाऱ्यांसाठी केंद्राकडून केली जातेय एका खास योजनेची आखणी. नेमका मुद्दा काय? पाहा...   

तरुणाईला जॅकपॉट! केंद्र सरकारकडून... नोकरीसंदर्भातील सर्वात मोठी, निश्चिंत करणारी बातमी

Job News : जागतिक आर्थिक मंदीचं (World Recession) सावट पाहता दर दिवशी बड्या संस्थांमधून मोठ्या संख्येनं कर्मचारी कपातीचे निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर कारणीभूत ठरत असून यंत्रमानवी बुद्धिमत्तेच्या वापरामुळं मनुष्यबळावर केला जाणारा खर्च कमी करण्यावर अनेक संस्थांचा भर दिसून येत आहे. याच कारणानं अनेक मोठ्या हुद्द्यांवरील आणि तितक्याच बड्या पगाराच्या नोकऱ्यासुद्धा अनेकांना गमवाव्या लागल्याचं दाहक वास्तव गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालं. 

भारतातही हे चित्र दिसणार? 

जगभरातील अनेक नोकऱ्या संकटात असतानाच आता भारतातसुद्धा हेच चित्र दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत असताना एक सकारात्मक बाब नुकतीच समोर आली असून, ही बाब येत्या काळातील तरुणाईसाठी खऱ्या अर्थानं जॅकपॉट ठरणार आहे. 

देशात कोणत्या क्षेत्रात निर्माण होणार नव्या रोजगार संधी? 

भारतात येत्या काळात सेमीकंडक्टर क्षेत्रात मात्र हजारो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून, मीकंडक्टरच्या उत्पादनात भारताला जागतिक स्तरावर इतर देशांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीनं कार्यक्षम करण्याच्या हेतूनं ही पावलं उचलली जात आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी दृष्टीनं उचलल्या जाणाऱ्या या पावलांनुसार 2030 पर्यंत भारताकडून या क्षेत्रात अर्थात जागतिक स्तरावर होणाऱ्या चिप बाजारपेठेत 8.3 लाख कोटी ते 9.13 लाख कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याचा मानस आहे. 

सेमीकंडक्टर प्रोग्रॅम्स आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटी, मायक्रॉन टेक्नॉलॉजी, वेदांता-फॉक्सकॉन, आयएमईसी (बेल्जियम), लेटी (फ्रान्स), टीएसएमसी (तैवान) यांच्यासोबत भागीदारीसाठी हालचाली सुरू असून भारताकडूनही त्यासाठी सातत्यानं भरिव योगदान देत भारतीयांसाठी अधिकाधिक रोजगार निर्मितीचं लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत. 

हेसुद्धा वाचा : विजांच्या कडकडाटासह पाऊसधारा बरसणार; राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये कसं आहे हवामान? 

 

सध्याच्या घडीला अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात सेमीकंडक्टर प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू केली असून, त्यामुळं या क्षेत्रात लाखो कुशल तंत्रज्ज्ञ तयार होणार असून तितक्याच रोजगारसंधीही उपलब्ध होणार आहेत असा विश्वास केंद्राकडून व्यक्त केला जात आहे. भविष्याच्या दृष्टीनं केंद्र शासनानं उचललेली ही पावलं पाहता देशाच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा यामुळं मोठा हातभार लागणार ही बाब नाकारता येत नाही. 

FAQ 

1. जागतिक आर्थिक मंदीमुळे भारतातील रोजगार संधींवर काय परिणाम होत आहे?
जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक देशांमध्ये कर्मचारी कपात होत आहे, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरामुळे. मात्र, भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात नव्या रोजगार संधी निर्माण होत असल्याने सकारात्मक चित्र दिसत आहे.

2. भारतात कोणत्या क्षेत्रात नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत?
भारतात येत्या काळात सेमीकंडक्टर क्षेत्रात लाखो रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या क्षेत्रातील उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

3. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची योजना काय आहे?
भारताने 2030 पर्यंत सेमीकंडक्टर क्षेत्रात जागतिक चिप बाजारपेठेत 8.3 लाख कोटी ते 9.13 लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे. 

Read More