Marathi News> भारत
Advertisement

पत्नी आणि मुलीला बेदम मारलं, अर्धनग्न करुन उन्हात बसवलं... स्वत: हसत हसत जेवला

क्रूरतेची परिसीमा ओलांडत पत्नीला अर्धनग्न अवस्थेत उन्हात बसवलं, CCTV मुळे घटना उघडकीस

पत्नी आणि मुलीला बेदम मारलं, अर्धनग्न करुन उन्हात बसवलं... स्वत: हसत हसत जेवला

Crime News : माणूस किती क्रुर होऊ शकतो याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. पत्नी आणि मुलीला बेदम मारहाण करत एका नराधमाने त्यांना  अर्धनग्न करत भर उन्हात बसण्याची शिक्षा दिली. पत्नी आणि मुलगी वेदनेने ओरडत होते, पण त्या नराधमाला त्यांची जराही दया वाटली नाही. उलट त्यांच्या किंकाळ्या ऐकत तो हसत हसत जेवत होता. सीसीटीव्हीत हे धक्कादायक कृत्य कैद झालं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली.

राजस्थानमधल्या जोधपूर थल्या फलौदी भागातील ही घटना आहे. बाबा रामदेव नगरमध्ये राहणारा कैलाश सुथार एका खासगी शाळेत शिक्षक आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी आजारी होती. तिच्या आजारपणाला कैलाश वैतागला होता. यावरुन त्या दोघांमध्ये नेहमी भांडण होत होती. अनेकवेळा कैलाश पत्नीला मारहाणही करत होता. 

घटनेच्या दिवशी याच कारणावरुन त्यांच्यात पुन्हा भांडण झालं. पण यावेळी कैलाशने क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पत्नीबरोबरच त्याने मुलीला बेदम मारहाण केली. पण यावरच तो थांबला नाही. पत्नीला अर्धनग्न करत त्याने घराच्या बाहेर उन्हात बसण्याची शिक्षा दिली. पत्नी वेदनेने किंकाळत होती, पण त्या नराधमावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. घरात जाऊन त्याने जेवण घेतलं आणि पत्नीच्या किंकाळ्या ऐकत आरामात जेवला. 

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फलौदी पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कैलाशला अटक केली. पोलिसी हिसका दाखवल्यानंतर कैलाशने आपली चूक कबूल केली. तसंच यापुढे पत्नी आणि मुलीला मारहाण करणार नाही असं लिहून दिलं. पत्नीचं मानसिक संतुलन बिघडलं असून तिच्या आजारपणामुळे स्वत:वरचा ताबा सुटल्याचं त्याने सांगितलं.

Read More