Marathi News> भारत
Advertisement

'या' घटनेनंतर ट्वीटरवर ट्रेण्ड करु लागला Joe Biden Is Not My President

 भारतात ट्वीटरवर #JoeBidenIsNotMyPresident ट्रेंड 

'या' घटनेनंतर ट्वीटरवर ट्रेण्ड करु लागला Joe Biden Is Not My President

नवी दिल्ली : जो बायडन (Joe Biden) यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर लगेचच भारतात ट्वीटरवर #JoeBidenIsNotMyPresident ट्रेंड करु लागले. हा 'करामत' भारतीय युजर प्रयार तिवारीने केली. प्रयाग तिवारीने असं ट्विट केलं जे इंटरनेटवर वायरल झालं. हे ट्विट नेटीझन्स (Netizens) ना इतकं भावलं की #JoeBidenIsNotMyPresident हे ट्रेंड करु लागलं.

काय आहे प्रकरण ?

आपल्या शपथग्रहणाआधी काही तास जो बायडन यांनी एक ट्वीट केलं होतं, 'हा अमेरिकेसाठी नवा दिवस आहे'. याची खिल्ली उडवण्यासाठी भारतीय यूजर प्रयाग तिवारीने उत्तर दिलं. जो बायडेन माझे राष्ट्रपती नाही आहेत. 

तुम्ही ट्रम्प समर्थक आहात का ? असा प्रश्न यावर त्याला विचारण्यात आला. त्याचे उत्तर 'नाही, मी भारतीय आहे.' या हलक्या फुलक्या गप्पा सोशल मीडियावर ट्रेण्ड करु लागला.

Read More