Marathi News> भारत
Advertisement

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूवर रतन टाटा यांनी उद्विग्न प्रतिक्रिया

मलप्पुरम येथे घडलेल्या या अमानवी कृत्याची देशभरातून आणि सर्वच स्तरांतून तीव्र शब्दांत निंदा केली जात आहे.

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूवर रतन टाटा यांनी उद्विग्न प्रतिक्रिया

मुंबई: kerala केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेला अननस खावून झालेला मृत्यू सध्या संपूर्ण देशात अनेकांच्या संतापाचा भडका उडवत आहे. केरळच्या मलप्पुरम येथे घडलेल्या या अमानवी कृत्याची देशभरातून आणि सर्वच स्तरांतून तीव्र शब्दांत निंदा केली जात आहे.

व्यक्ती, माणूस म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो हाच मुद्दा इथं उपस्थित करत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उद्योग जगतात अनेकांसाठी आदर्श असणाऱ्या रतन टाटा यांनीसुद्धा एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अनेकांच्याच सूरात सूर मिसळला. सोबतच त्यांनी प्राण्यांसाठी न्यायाची मागणीही केली.

'एका निष्पाप आणि गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला देऊन तिला मुत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्यां माणसांविषयी कळताच मला अत्यंत दु:ख झालं आणि धक्काही बसला. निष्पाप प्राण्यांची हत्या करण्याची ही क्रूर घटना मुष्यवधाच्या गुन्ह्याहून काही वेगळी नाही. या प्रकरणात (प्राणीमात्रांना) न्याय मिळायलाच हवा', असं ट्विट त्यांनी केलं.

दरम्यान, एका मुक्या प्राण्याची निष्ठुरपणे हत्या केल्याच्या कृत्याची सर्व स्तरांतून निंदा होत असतानाच राजकीय वर्तुळातूनही यावर आता आरोप प्रत्यत्यारोपांचं सत्र डोकं वर काढताना दिसत आहे. भाजप खासदार आणि पशु अधिकार कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी हत्तीणीच्या हत्येबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत राहुल गांधी यांच्यापुढएही एक प्रश्न उपस्थित केला. केरळमधीलच एका मतदार संघातून खासदार असणाऱ्या राहुल गांधी यांनी याबात कोणती कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

Read More