Marathi News> भारत
Advertisement

हेरगिरी करणारी युट्यूबर ज्योती मल्होत्राचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन; धक्कादायक Video समोर

Jyoti Malhotra Link With Pahalgam Attack: ज्योती मल्होत्रा ही अनेकदा पाकिस्तानात जाऊन आल्याचं उघड झाल्यानंतर आणखी एक धक्कादायक कनेक्शन समोर आलंय

हेरगिरी करणारी युट्यूबर ज्योती मल्होत्राचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन; धक्कादायक Video समोर

Jyoti Malhotra Link With Pahalgam Attack: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली हरयाणामधील हिसार येथील यू-ट्युबर ज्योती मल्होत्रासंदर्भात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या ज्योतीची राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए, गुप्तचर यंत्रणा म्हणजेच आयबी, मिलेट्री इंटेलिजन्स आणि इतर संस्थांच्या माध्यमातून कसून चौकशी केली जात आहे. असं असतानाच युट्यूबवर तिच्या चॅनेलवरील व्हिडीओंमधून नवीन खुलासे होत आहेत. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात केक मागवण्यात आला होता. हा केक उच्चायुक्तालयात घेऊन जणाऱ्या व्यक्तीचं ज्योती मल्होत्रा कनेक्शन समोर आलं आहे. 

कशी आणि कधी झाली अटक?

पाकिस्तानी गुत्पचर यंत्रणा म्हणजेच आयएसआयचे अधिकारी ज्योतीच्या संपर्कात होते. या अधिकाऱ्यांना ज्योतीने नेमकी कोणती माहिती दिली? तिच्याकडून कोणती माहिती मागवली जात होती याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी रविवारी रात्री उशारी पावणे दोनच्या सुमारास ज्योतीच्या घरी छापेमारी करुन तिला ताब्यात घेताना तिच्या घरातील कागदपत्रं, तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला. या लॅपटॉपमधील काही डेटा ज्योतीने डिलिट केल्याची शक्यता असून तो परत मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाकिस्तानची प्रतिमा चांगली दाखवण्यासंदर्भातील सूचना ज्योतीला करण्यात आलेल्या. आता ज्योतीचं पाकिस्तान कनेक्शन समोर येत असतानाच त्याचा थेट संबंध पहलगाम हल्ल्याशीही असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी उच्चायुक्तालयात झालेल्या कथित सेलिब्रेशनमधील महत्त्वाचा दुवा असलेली व्यक्ती ज्योतीच्या एका व्हॉगमध्ये दिसली आहे.

पाकिस्तान उच्चायुक्तालयातील केक सेलिब्रेशन

मिळालेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी म्हणजेच पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर एक कर्मचारी चक्क केकचं बॉक्स घेऊन जाताना दिसला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हे सारं सेलीब्रेशन कशासाठी असा प्रश्न या केक घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला विचारला असता त्याने काहीही उत्तर दिलं नाही. ही व्यक्ती हातातील बॉक्स घेऊन उच्चायुक्तालयाच्या मुख्य द्वारातून आतामध्ये शिरली. हीच व्यक्ती आता ज्योतीच्या एका व्लॉगमध्ये दिसून आली आहे. त्यामुळेच ज्योतीचं पाकिस्तान कनेक्शन उघड करणारा हा आणखी एक पुरावा असल्याचं अनेकांनी हा व्यक्ती ज्योतीसोबत दिसल्यानंतर म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

ज्योतीचं पहलगाम कनेक्शन

पहलगाममधील हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी ज्योती पाकिस्तानला जाऊन आलेली. त्यानंतर ती पहलगाम, गुलमर्ग, दल लेक, पँगोंग लेक या ठिकाणी पर्यटनाच्यानिमित्ताने जाऊन आली. पँगोंग लेक परिसर चीनच्या एएसी सीमेजवळ असल्याने ज्योतीबद्दल तपास यंत्रणांना संशय आला आणि तो संशय खरा निघाला. 

Read More