Jyoti Malhotra Use Mobile Apps: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली. भारताच्या लष्करी ऑपरेशन ऑपरेशन सिंदूरसह लष्कराशी संबंधित अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप तिच्यावर आहे. ज्योती मल्होत्रा 2023 चा व्हिसा मिळविण्यासाठी एका एजंटची मदत घेऊन पाकिस्तानला गेली. या भेटीदरम्यान तिची भेट नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. 13 मे 2025 रोजी दानिशला पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आणि भारतातून हद्दपार करण्यात आले. रहीमच्या मदतीने ज्योती दोनदा पाकिस्तानला गेली आणि रहीमचा सहकारी अली एहवानशी तिची ओळख झाली. ज्योतीचा पाकिस्तानमधील राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च त्यांनीच केला.
दानिशने ज्योतीची ओळख अनेक पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी म्हणजेच पाकिस्तान इंटेल ऑपरेटिव्ह-पीआयओ यांच्याशी करुन दिली होती. भारतीय ठिकाणांबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण केल्याचा ज्योतीवर आरोप आहे. ज्योतीचे एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी जवळचे संबंध होते आणि ती त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली येथेही गेली होती, असेही तपासात पुढे आले आहे. पहलगाममधील भयानक हत्याकांडानंतर जेव्हा भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले तेव्हा ज्योती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर 'युद्धाला नकार द्या' असे संदेश पोस्ट करत होती. एवढेच नव्हे तर आपल्या हालचालींवर संशय येऊ नये म्हणून तिने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि दानिशशी बोलण्यासाठी स्नॅपचॅट आणि टेलिग्रामचा वापर केला.
ज्योती पाकिस्तानात पोहोचली आणि अली एहवानने तिची ओळख पाकिस्तानी संरक्षण आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. तिथे शकीर आणि राणा शाहबाज यांना भेटल्याचे ज्योतीन कबूल केले आहे. संशय येऊ नये म्हणून तिने शाकीरचा मोबाईल नंबर जाट रंधावा या नावाने सेव्ह केला. यानंतर मी भारतात आले आणि सोशल मीडियाद्वारे वरील सर्वांशी संपर्कात होते, असे ज्योतीने सांगितले. त्या सर्वांनी माझ्याकडे देशद्रोह करणारी माहिती मागितली, जी मी दिल्याचे ज्योतीने सांगितले. तसेच आपण रहीमला अनेक वेळा भेटल्याचेही ती म्हणाली. या भेटीदरम्यान एहसान-उर-रहीम उर्फ दानिशने ज्योतीचा मोबाईल नंबर घेतला आणि नंतर ते फोनवर बोलू लागले. मी दोनदा पाकिस्तानला गेली होती आणि एहसान-उर-रहीमच्या ओळखीच्या अली नावाच्या व्यक्तीने माझ्या पाकिस्तानातील प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केल्याचे ज्योतीने पोलिसांना सांगितले.
अलीने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत माझी भेट घालून दिली. यानंतर तो शाकीर आणि राणा शाहबाज यांनाही भेटला. जेव्हा मी भारतात परतली तेव्हा व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे त्यांच्याशी संपर्कात राहिल्याचे ज्योतीने कबूल केले. या काळात ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांनाही अनेक वेळा भेटल्याचे तपासात समोर आले.
हिसार पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. चौकशीदरम्यान ज्योती मल्होत्राने सांगितले की, ती 2023 मध्ये पाकिस्तानला भेट देण्यासाठी लागणारा व्हिसा मिळविण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची भेट एहसान-उर-रहीम उर्फ दानिश नावाच्या व्यक्तीशी झाली.आता ज्योतीजींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 152 आणि अधिकृत गुपिते कायदा 1923 च्या कलम 3,4,5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.