Marathi News> भारत
Advertisement

कल्याण सिंग यांची प्रकृती चिंताजनक; योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह यांनाही ओळखू शकले नाहीत

कल्याण सिंह यांच्या लखनऊच्या पीजीआय रूग्णालयात  उपचार सुरू आहेत. 

कल्याण सिंग यांची प्रकृती चिंताजनक; योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह यांनाही ओळखू शकले नाहीत

नवी मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (UP Former CM Kalyan Singh)यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर लखनऊच्या पीजीआय रूग्णालयात  उपचार सुरू आहेत. नुकतेच त्यांना लोहिया रूग्णालयाच्या आयसीयूमधून पीजीआय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी मुखमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील कल्याण सिंह यांच्या प्रकृतीबद्दल  विचारपूस करण्यासाठी रूग्णालयात पोहोचले. पण कल्याण सिंह कोणालाही ओळखू शकले नाही. शनिवारी कल्याण सिंह यांना ब्रेन स्ट्रोक आणि ह्रदय विकाराचा  झटका आल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

सध्या त्यांची प्रकृती नाजूक आहे. कमल सिंह यांच्या तब्येतीबद्दल माहिती मिळताचं मुखमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रूग्णालयात पोहोचले. पण कल्याण सिंग कोणालाचं ओळखू शकले नाही. या क्षणी समजून घेण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

 लोहिया रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम सिंह यांनी सांगितले, 'माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना पॅरोटेड ग्रंथीमध्ये संसर्ग झाल्यानंतर 27 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.' सांगायचं झालं तर गेल्या  काही दिवसांपासून कल्याण सिंह यांची प्रकृती  स्थिर नाही. प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यानंतर त्यांना पीजीआय  रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Read More