Kapil Sibbal on Waqf Board: लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर, आता राज्यसभेमध्येही हे विधेयक सहजपणे पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलं. राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानावेळी या विधेयकाच्या बाजूने 128 मतं पडली. तर 95 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. आता हे विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल. त्यांच्या मान्यतेनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणं केवळ एक पाऊल दूर आहे.
इथं देशभरातील राजकीय वर्तुळात सध्या वक्फ विधेयकावरून वादंग माजलेलं असतानाच गुरुवारी राज्यसभेतही अपक्षांनी या विधेयकावरून गदारोळ माजवल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीसुद्धा या विधेयकासंदर्भातील तरतुदींवर आपली भूमिका स्पष्ट केली. आपण आपली संपत्ती हवं त्याला दान करू असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं.
'समजा मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे किंवा ख्रिस्त आहे आणि माझ्याकहे काही संपत्ती आहे जी मला दा न स्वरुपात द्यायचीये. इथं मला कोण थांवणार..... कोणीच नाही थांबवू शकत', असं सिब्बल म्हणाले. 1954 आणि 1995 च्या सुधारणांचा उल्लेख करत त्यामध्ये फक्त मुस्लीम व्यक्तीच वक्फ बनवू शकतात (दान करु शकतात), इथं इतर कोणालाही आपली संपत्ती वक्फ बोर्डाला दान करण्याची परवानगी नाही. 2013 मध्ये यात पुन्हा सुधारित तरतुदी करत हा निर्बंध काढण्यात आला. ज्यानंतर आता पुन्हा फक्त मुस्लीमच वक्फ देऊ शकतात असं म्हटलं गेलं. इथं सिब्बल यांनी काही न्यायालयीन आदेशांचा उल्लेख केला जिथं हिंदूंनी आपल्या जमिनी कब्रस्तान आणि तत्सम योजनांसाठी दान दिल्या आहेत.
नव्या सुधांरणांचा उल्लेख करत त्यात दान करणाऱ्या व्यक्तीनं गेल्या पाच वर्षांपासून इस्लामचं पालन केलेलं असावं असं असल्यासच ती व्यक्ती वक्फ म्हणजेच दान करू शकते ही बाब नमूद केली. इथं सत्ताधाऱ्यांना आव्हान देत त्यांनी केलेल्या तरतुदींनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला संपत्ती वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आल्याची बाब अधोरेखित करत जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये काय तपास करणार? प्रतिप्रश्न सिब्बल यांनी मांडला.
वक्फ बोर्ड निर्णय कसा घेऊ शकतं, त्यांचा निर्णय अंतिम कसा असू शकतो? हाच प्रश्न सत्ताधारी करत आहेत असं म्हणत हिंदू एंडोमेंट अॅक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत ते निर्णय अंतिम आहेत. तिथं तुम्हाची काहीच हरकत नाही पण, इथं वक्फ बोर्डाच्या निर्णयात मात्र तुमची हरकत आहे... असा टोला कपिल सिब्बल यांनी लगावला.
सिब्बल यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधक आणि अपक्षांना तुम्ही तुमचे मुद्दे मांडून, प्रश्न उपस्थित करून सदनातून निघून जाता आणि उत्तरं ऐकत नाही असं म्हणत आम्ही उत्तर तेव्हाच देऊ जेव्हा ते ऐकण्यासाठी तुम्ही सभागृहात उपस्थित असाल अशा शब्दांत आव्हान देत वक्फ ही धार्मिक संपत्ती नसल्याची बाब अधोरेखित केली.