Marathi News> भारत
Advertisement

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पांनी बदलली नावाची स्पेलिंग

राजकारणात यश मिळावे म्हणून येडियुरप्पांनी आपल्या नावाची स्पेलिंग बदलली होती.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पांनी बदलली नावाची स्पेलिंग

बंगळुरु: भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, यापूर्वी त्यांनी आपल्या इंग्रजी नावाची स्पेलिंग बदलली आहे. यापूर्वी २००७ मध्ये राजकारणात यश मिळावे म्हणून येडियुरप्पांनी आपल्या नावाची स्पेलिंग बदलली होती. यानंतर येडियुरप्पांनी आता पुन्हा एकदा हीच स्पेलिंग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 

येडियुरप्पा यांच्या नावाची स्पेलिंग Yediyurappa अशी आहे. मात्र, २००७ मध्ये त्यांनी I ऐवजी D वापरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, येडियुरप्पांनी हा बदल सहा महिन्यापूर्वीच केला होता, असे काही जणांचे म्हणणे आहे. परंतु, याबाबत अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही. 

विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे काही दिवसांपूर्वीच एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळले होते. यानंतर शुक्रवारी भाजपकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. 

येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. तसेच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आजच पार पडावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

त्यानुसार संध्याकाळी ६ वाजता बी.एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. 

fallbacks

तत्पूर्वी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष केआर रमेश यांनी गुरुवारी तीन बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. यामध्ये काँग्रेसच्या दोन आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. रमेश जारकीहोली, महेश कुमाथल्ली आणि आणि आर. शंकर अशी या आमदारांची नावे आहेत. 

विधानसभा अध्यक्षांनी या तिघांविरोधात पक्षबदल कायद्यातंर्गत  (अँटी डिफेक्शन) कारवाई केली आहे. लवकरच अन्य बंडखोर आमदारांबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Read More