Crime News : कर्नाटकताल्या (Karnataka Crime) एका बातमीने एकच खळबळ उडाली आहे. घरातल्या घरात शेती करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) अटक केली आहे. अटक केलेली मुले आपल्या ग्राहकांना आपला विकत होती. मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी वैद्यकीय (MMBBS) शिक्षण घेणाऱ्या तिन्ही विद्यार्थ्यांना अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही मुले घरातल्या घरात गांजाची (Cannabis) शेती करत होते आणि त्याची विक्री करत होते. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी या तरुणांना अटक केली आहे.
कर्नाटकात पोलिसांनी घरी गांजा उगवणाऱ्या आरोपीसह 3 मुलांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका मुलाने कुंडीत गांजा पिकवला होता. हा गांजा विकून तो पैसे कमवत असे. अटक करण्यात आलेले विद्यार्थी तामिळनाडू आणि केरळमधील आहेत. पोलिसांनी त्याच्या फ्लॅटमधून गांजाची झाडे लावलेल्या कुंड्याही जप्त केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या कृत्याची माहिती मिळताच आजूबाजूला खळबळ उडाली आहे.
पोलिसांना काय काय सापडलं?
कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विघ्नराज (28) हा तामिळनाडूतील कृष्णगिरीचा रहिवासी आहे. विघ्नराज कर्नाटकातील शिवमोग्गा येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. तिथेच तो भाड्याच्या घरामध्ये गांजा पिकवला होता. शिवमोग्गाचे पोलीस अधीक्षक जीके मिथुन कुमार म्हणाले की, "पोलिसांना माहिती मिळाली होती की हा आरोपी गेल्या तीन, साडेतीन महिन्यांपासून गांजा विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे. या छाप्यादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 227 ग्रॅम गांजा, 1.53 किलो कच्चा गांजा, 10 ग्रॅम चरस, गांजाच्या बिया असलेली एक छोटी बाटली, भांग तेलाच्या 3 सिरिंज, गांजा पावडर बनवण्यासाठी वापरलेले दोन कॅन जप्त केले आहेत." विघ्नराज घरमालकाच्या लक्षात येऊ न येता घरात कृत्रिम वातावरण तयार करून कुंड्यांमध्ये गांजा पिकवत होता. त्यानंतर तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांजा विकायचा, असेही पोलिसांनी सांगितले.
इतर दोन आरोपींनाही अटक
Police arrest 3 students for growing, selling cannabis in Karnataka's Shivamogga
— ANI Digital (@ani_digital) June 25, 2023
Read @ANI Story | https://t.co/SCa8ftkhCv#Karnataka #Cannabis #Shivamogga pic.twitter.com/OYbsvQAZ6t
केरळमधील इडुक्की येथील रहिवासी असलेला विनोद कुमार (27) आणि तामिळनाडूतील धर्मपुरी येथील रहिवासी असलेला पंडीडोराई (27) अशी उर्वरित दोन आरोपींची नावे आहेत. विघ्नराजच्या घरी छापा टाकला तेव्हाच पोलिसांनी त्यांना पकडले होते. हे दोघेही घटनास्थळी गांजा खरेदी करण्यासाठी आले तिथे आले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक जीके मिथुन कुमार यांनी दिली.
घरातच पिकवायचा गांजा
विघ्नराज हायटेक शेती करून गांजा पिकवत असे. विघ्नराज भाड्याच्या घरात एका कुंडीत गांजा पिकवत होता. पोलिसांनी विघ्नराजच्या घरातून एक एक्झिट फॅन, सहा टेबल फॅन, दोन स्टॅबिलायझर, तीन एलईडी लाईट, रोलिंग पेपर, दोन हुक्क्याचे पाईप, 4 हुक्क्याच्या कॅप आणि गांजा स्टेम आणि 19 हजार रुपये रोख जप्त केले आहे. शिमोगा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जानेवारी 2023 मध्येही मंगळुरू पोलिसांनी गांजा पिकवण्याच्या आणि विक्रीच्या आरोपाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यासह 10 जणांना अटक केली होती.