Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटक निवडणूक : कमी जागा मिळवूनही काँग्रेसची भाजपवर मात

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भले ही भाजपने सर्वाधिक जागा मिळवत विजय मिळवला असेल मात्र, काँग्रेस पक्षाने एका बाबतीत भाजपला मात दिली आहे.

कर्नाटक निवडणूक : कमी जागा मिळवूनही काँग्रेसची भाजपवर मात

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भले ही भाजपने सर्वाधिक जागा मिळवत विजय मिळवला असेल मात्र, काँग्रेस पक्षाने एका बाबतीत भाजपला मात दिली आहे.

शंभरी गाठण्यात काँग्रेसला अपयश मात्र...

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात भाजपने शंभरी ओलांडत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. तर, काँग्रेसला शंभरी गाठण्यात अपयश आलं. पण काँग्रेसने मतांच्या टक्केवारीत ३७.९ % मतं मिळवत अव्वल क्रमांक गाठला आहे. ही टक्केवारी इतर पक्षांनी मिळवलेल्या मतांच्या टक्केवारीत सर्वाधिक आहे.

राहुल गांधींच्या प्रयत्नांना यश

राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेत्रृत्वात निवडणूक लढवल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मतांची टक्केवारी प्राप्त केली आहे. राहुल गांधींच्या प्रयत्नांमुळेच ही टक्केवारी मिळण्यात यश आलं असल्याचं बोललं जात आहे. भविष्यासाठी काँग्रेससाठी हे खूपच सकारात्मक आहे.

fallbacks
Image: eciresults.nic.in

अशी आहे मतांची टक्केवारी

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कर्नाटक विधानसभा निवडणूक मतांच्या टक्केवारीनुसार काँग्रेसला सर्वाधिक ३७.९ टक्के, भाजपला ३६.२ टक्के, जेडीएसला १८.५ टक्के, आयएनडीला ४.० टक्के, बसपाला ०.३ टक्के मतं मिळाली आहेत. यासोबत इतरांना दोन टक्के मतं मिळाली आहेत. 

Read More