Marathi News> भारत
Advertisement

Blue Revolution चे जनक डॉ. सुबन्ना अयप्पन यांचा मृत्यू, नदीत आढळला मृतदेह

Dr Subbanna Ayyappan Found Dead: Blue Revolution चे जनक  डॉ. सुबन्ना अयप्पन यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला. 

Blue Revolution चे जनक डॉ. सुबन्ना अयप्पन यांचा मृत्यू, नदीत आढळला मृतदेह

Dr Subbanna Ayyappan Found Dead: लोकप्रिय कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री डॉ. सुबन्ना अयप्पन (70) यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला आहे. कर्नाटकातील श्रीरंगपत्तन येथील श्री आश्रमच्या जवळून वाहणाऱ्या कावेरी नदीत त्यांचा मृतदेह सापडला होता. 10 मे रोजी ही घटना घडली होती. सुबन्ना अयप्पन यांच्या पाश्चात्त कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. डॉ. अयप्पन यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 7 मेपासून ते राहत्या घरातून बेपत्ता होते. 10 मे रोजी त्यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला. भारतातील Blue Revolution निळी क्रांतीचे जनक असलेल्या डॉ. सुबन्ना अयप्पन यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. 

श्रीरंगपत्तन पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन तपास सुरू केला आहे. पोलिसांना शनिवारी कावेरी नदीत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख तपासताच ते दिग्गज कृषी तज्ज्ञ आणि पद्मश्री डॉ. सुबन्ना अय्यपन असल्याचे समोर आले. नदीच्या किनारी त्यांची स्कुटरदेखील सापडली आहे. डॉ. अय्यप्पन हे त्यांच्या कुटुंबासह मैसूर येथील विश्वेश्वरा नगर इंडस्ट्रियल एरियात राहत होते.

देशात ब्लू रेव्होल्यूशनला वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सरकारने 2022 रोजी त्यांचे योगदान आणि कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. डॉ. अय्यप्पन यांनी मत्स विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी बंगळुरूतील अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीतून पीएचडी केली होती. देशात  ब्लू रेव्होल्यूशन (निळी क्रांती- मत्स पालन) ला चालना देण्यासाठी त्यांनी भरपूर कार्य केले. मत्स्यव्यवसायात क्रांती घडवण्यासाठी आणि मत्स्यपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ब्लू रेव्होल्यूशन ही योजना महत्त्वाची आहे. 

Read More