Marathi News> भारत
Advertisement

दहशतवाद्यांच्या धमकीनंतर केंद्र सरकार खरेदी करणार काश्मीर सफरचंद

जम्मू-काश्मीरमधल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 

दहशतवाद्यांच्या धमकीनंतर केंद्र सरकार खरेदी करणार काश्मीर सफरचंद

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांकडून सफरचंदाची थेट खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नाफेड ही सरकारी संस्था राज्य सरकारच्या अधिकृत संस्थेमार्फत खरेदीची प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार आहे. थेट लाभ हस्तांतरण या योजनेद्वारे खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. 

fallbacks

दरम्यान, दहशतवाद्यांनी शेतकऱ्यांना सफरचंद बाजारात विक्री न करण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेऊन सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मिर खोऱ्यात हळूहळू परिस्थिती सुधारण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण आपला धंदाच बंद होतो की काय, या भीतीने दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी नवा कट रचला आहे. काश्मीरची ओळख असणारे सफरचंद बाजारात नेण्यापासून रोखण्याचा फुटीरतावांद्याचा डाव आहे.  

जम्मू काश्मिरमध्ये शोपियाँसह अनेक ठिकाणी दहशतवादी स्थानिक सफरचंदाच्या बाग मालकांना धमक्या देत आहेत. सफरचंद बाजारात गेली तर थेट जीवानीशी मारू. सफरचंद खराब झाली तर सर्वसामान्य काश्मिरी सफरचंद बाग मालकांच मोठे नुकसान होत होते. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेत सफरचंद खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सफरचंद बाग मालाकांना मोठा दिसाला मिळणार आहे.

Read More