Marathi News> भारत
Advertisement

Kashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव

Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे. 

Kashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव

Kashmir School Girl Viral Video : सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्मवर आहे जिथे आपण आपल्या व्यथा, आपला आनंद अगदी आपलं सुख दु:खाच्या भावनांना मोकळं करतो. या सोशल मीडियामुळे देशातील अनेक धक्कादायक प्रकार आणि भयाण वास्तव समोर आले आहेत. या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओ आणि फोटोद्वारे घटनांना वाचा फोडली जाते. एवढंच नाही तर या घटनांची दखल सरकार आणि संबंधित विभागाकडून घेतली जाते. 

सध्या सोशल मीडियावर एका क्यूट मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लहान मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दरबारात व्यथा मांडली आहे. या चिमुकलीने अख्खा जगासमोर एका व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या गावातील शाळेचं धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे. 

मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव

या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, मोदींजी, तुम्ही कसे आहात, ठीक आहात का? माझं नाव सीरत नाज आहे आणि मी लोही मल्हार इथे राहते. मी सरकारी शाळेत शिकते. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सर्वांचं ऐकालं तर माझंही ऐका. 

पुढील ती व्हिडिओमध्ये, तिच्या संपूर्ण शाळेचा फेरफटका मारते. मुख्याध्यापक कार्यालयापासून कर्मचारी कक्षापर्यंत... सीरत पुढे म्हणते की,  बघा आमचा मजला किती घाणेरडा झाला आहे आणि आम्हाला इथे बसायला लावतात. मोदींजी, कृपया एक चांगली शाळा बनवा.

शाळेचं भयाण वास्तव

या व्हिडीओमध्ये त्या चिमुकलीने मुख्याध्यापकांचं कार्यालयापासून स्टाफ रुमपर्यंत तिने सगळं दाखवलं आहे. पुढे ती त्या कुठल्या जागेवर बसून शिकतात ते दाखवलं. एक मोकळं मैदान आणि अस्वच्छ सगळीकडे...गलिच्छ आणि तुटलेले टॉयलेट ...मुलींना उघड्यावर शौच करावं लागतं असं तिने सांगितल्यावर धक्काच बसला. शाळेतील मुली कुठे शौचला जातात तो नालाही तिने दाखवला.

कुठलीही आहे ही शाळा ? 

ही मुलगी जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावची राहते. तिने लोहाई इथल्या सरकारी हायस्कूल शाळेचं भयाण वास्तव मोदीसह अख्खा जगासमोर आणलं आहे. एवढ्या कमी वयात एवढं मोठं धाडस पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ ट्वीटरवर @factual_dogra या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

TAGS

kashmiri school girl videokashmiri school girl request pm modiPM Narendra Modikashmiri girl school video viralsocial media trending videosocial media viral videoकाश्मिरी मुलीच्या शाळेचा व्हिडीओकाश्मिरी मुलीनी पंतप्रधानांसमोर मांडली व्यथाकाश्मिरी मुलीची पंतप्रधानांकडे मागणीकाश्मिरी मुलीचा शाळेचा व्हिडीओसोशल मीडिया ट्रेंडिंग व्हिडीओसोशल मीडिया व्हायरल व्हिडीओnewslatest newstoday newsBreaking Newsnews headlinesBollywood Newsindia newstop newspolitical newsBusiness NewsTechnology NewsSports newsviral trending videoviral videosFunny Viral Videostoday trending videossocial viral trendstoday trends in Indiatrending videos in Indiatrending videos in Maharashtraट्रेंडिंग विषयव्हायरल व्हिडिओट्रेंडिंग व्हिडिओआजचे ट्रेंडिंग व्हिडिओट्रेंडिंग न्यूजट्रेंडिंग न्यूज मराठीमराठी ट्रेंडिंग व्हिडिओआजचे ट्रेंडिंग न्यूजlatest news maharashtra politicsmaharashtra news todaymaharashtra news today liveMaharashtra Latest News
Read More