Kedarnath Yatra 2025: उत्तराखंडची चारधाम यात्रेची भाविक आतुरतेने वाट बघत असतात. ही यात्रा जगप्रसिद्ध आहे. चार धाम यात्रेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की ही यात्रा केल्याने माणसाचे पाप धुतले जाते आणि मोक्ष प्राप्त होतो. उत्तराखंडच्या चारधाम यात्रेत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम यांचा समावेश आहे. चारधाम यात्रा वर्षभरात फक्त सहा महिनेच असते. थंडीच्या दिवसात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि ठरलेल्या वेळात उघडले जातात. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ-बद्रीनाथच्या दर्शनासाठी येतात. तुम्हालाही चारधामला जायचे असेल तर अखेरीस ती वेळ अली आहे आणि तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे एक दोन महिन्यानंतर अर्थात 2 मे 2025 रोजी सकाळी 6:20 वाजता पुन्हा उघडतील. सकाळी ७ वाजल्यापासूनच यात्रेकरूंना केदारनाथ मंदिरात प्रवेश मिळेल. केदारनाथ मंदिर 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाविकांसाठी बंद राहणार आहे.
हे ही वाचा: रोहित शर्मा पुढचा सामना खेळणार नाही ? 'हा' 25 वर्षांचा फलंदाज होऊ शकतो न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात कर्णधार
केदारनाथ मंदिराव्यतिरिक्त अन्य तिन्ही धामांचे दरवाजेही उघडण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यमुनोत्री मंदिर 30 एप्रिल 2025 रोजी भाविकांसाठी खुले होणार आहे. तर 30 एप्रिलपासूनच यात्रेकरू गंगोत्रीचे दर्शन घेऊ शकतात. तथापि, 4 मे 2025 पासून बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडत आहेत.
हे ही वाचा: पृथ्वीखाली काहीतरी हलत आहे? दिवसाच्या 24 तासातील काही तास कमी होणार? जाणून घ्या शास्त्रज्ञांचा अभ्यास
चारधाम यात्रेची नोंदणी 2 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. चार धाम यात्रेची नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून करता येईल. उत्तराखंड सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर भाविक नोंदणी करू शकतात. ट्रिपचे नियोजन करताना, हवामानाची परिस्थिती समजून घ्या आणि सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करा.