Marathi News> भारत
Advertisement

होय मी काळी! तर मग ब्रह्मांडातील सर्वात शक्तीशाली घटकाचा रंग कोणता? मुख्य सचिवाची पोस्ट एकदा वाचाच…

आजच्या 21 व्या शतकातही काही स्त्रियांना त्यांच्या रंगावरून डिवचलं जातंय. समाज पुढारलाय, असं आपण म्हणतो पण खरंच तसं आहे का? हा प्रश्न एका महिला अधिकाऱ्याच्या फेसबुक पोस्टवरून पडलाय. 

होय मी काळी! तर मग ब्रह्मांडातील सर्वात शक्तीशाली घटकाचा रंग कोणता? मुख्य सचिवाची पोस्ट एकदा वाचाच…

मुंबई : स्त्रीनं यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. प्रत्येकवेळी स्वत:ला सिद्ध केलं. पण आजच्या 21 व्या शतकातही काही स्त्रियांना त्यांच्या रंगावरून डिवचलं जातंय. समाज पुढारलाय, असं आपण म्हणतो पण खरंच तसं आहे का? हा प्रश्न एका महिला अधिकाऱ्याच्या फेसबुक पोस्टवरून पडलाय. 

मुलगी जन्मली.. कशीय ... गोरी आहे नं? लग्न ठरवताना मुलगी गोरी आहे का? हा संवाद काहींच्या कानावर पडला असेलच. आता कुठे असं असतं? 21 वं शतक आहे, पण नाही अजूनही काहींची मानसिकता तशीच आहे. केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांना याचा प्रत्यय आलाय. कृष्णवर्णीय रंगामुळे भारतातच त्यांना रंगभेदाला सामोरं जावं लागलं. त्या उद्विग्न झाल्या आणि समाजमाध्यमावर आवाज उठवला.

काय म्हणाल्या शारदा मुरलीधरन?

भारतीय समाजात स्त्री असणं कठीण आहे. मात्र कृष्णवर्णीय स्त्री असणं म्हणजे तुम्ही अस्तित्वहीन होऊन जाता. वरीष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असताना एका व्यक्तीनं डिवचलं. माझ्या कार्यकाळाबाबत अपमानजनक टिप्पणी केली. मी दुखावले गेले कारण त्याचा संदर्भ कृष्णवर्णीय रंगाशी होता. 'तुझ्या रंगाची कारकीर्द जितकी गोरी तितकी तुझी काळी' असं ते विचित्र विधान केलं गेलं. 

हेही वाचा : 'अंबानी आहेस की भिकारी,' शाळेत उडवण्यात आली होती अनंत अंबानीची खिल्ली, नीता अंबानी यांनी सांगितला कुटुंबाचा 'तो' काळ

 

मात्र आता हे त्यांच्याबाबतीत घडलंय असं नाही गेल्या 50 वर्षांपासून आपण सुंदर नाही, या ओझ्याखाली आपण जगत आलोय. असं त्या म्हणतात.. काळा रंग हा चांगला नाहीच... त्यातही एखादी स्त्री काळी असेल तर ती अस्तित्वहीन मानली जाते..  अशी खंत त्यांनी व्यक्त केली..  पण शारदा यांनी आपला रंग स्वीकारला.. आणि तो स्वीकारण्याची प्रेरणा आपल्या मुलांनी दिली.  कृष्णवर्णीय रंग सुंदर आहे, तो विश्वाची सर्वव्यापी सत्यता आहे. शारदा मुरलीधरन यांनी रंगभेदाला सामोरं जाण्याचा आपला अनुभव मांडला...पण सोबतच त्यांनी प्रश्नही उपस्थित केला... 'कृष्णवर्णीय स्त्रियांना का दुर्लक्षित केलं जातं?' त्यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

fallbacks

चर्चा तर होतच राहील पण आपण मानसिकता बदलणार आहोत का?  काळी-गोरी, जाड-बारीक अशा अनेक टिप्पण्या महिलांच्या देहावर केल्या जातात. थोडक्यात तिला कमी लेखलं जातं. टॉल डार्क हँडसम असा मुलगा चालतो पण मुलगी मात्र गोरीच हवी. म्हणून सोशल मीडियावर मुली फोटो, व्हिडीओ टाकताना फिल्टर वापरून उजळ दिसण्याचा प्रयत्न करतात. हे खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे. मनापासून स्वीकारलं गेलं पाहिजे. 

Read More