Kolkata Gangrape : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या अजून कोणी विसरलं नाही. तेच आता लॉ कॉलेजमधील 24 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराचा प्रकरणामुळे देशात पुन्हा खळबळ माजली आहे. या घटनेनंतर भाजप सतत तृणमूल काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करत आहे. धक्कादायक म्हणजे या सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेचे (टीएमसीपी) विद्यमान संघटन सचिव आहे. मनोजित मिश्रा असं त्याच नाव आहे. त्याची पोलीस कसून चौकशी करत असताना मिश्राबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
कोलकता लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोजित मिश्राबद्दल पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. मनोजित मिश्रा उर्फ मँगो हा बऱ्याच काळापासून लैंगिक हिंसाचाराकडे झुकल्याच समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो अनेक मुलांना लग्नाच आमिष दाखवून तो लैंगिक छळ करायचा. आरोपी मिश्रासोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने त्याचाबद्दल धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. ती म्हणाली की, मनोजित मिश्रा हा कॉलेजमध्ये त्याच्या दुष्कृत्यांसाठी प्रसिद्ध होता. तो सतत मुलांना त्रास द्यायचा. त्यांचा छळ करायचा. ज्यामुळे कॉलेजमधून त्याला काढून टाकण्यात आले होते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याला नंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर तो नंतर युनियन रूममध्ये मुलींना बोलवायचा आणि तिथे तो दारू प्यायचा. एवढंच नाही तर ज्युनियर्सचे अपहरण करायचा. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्यानंतर त्याला अनेक वेळा इशारा देण्यात आला होता. एक वेळ अशी आली होती की, त्याला फक्त परीक्षा देण्यासाठी कॉलेजमध्ये येण्याची परवानगी होती. त्या काळात तो सर्वांशी गुंडासारखा वागायचा. तो मुलींसोबत घालवलेले क्षण रेकॉर्ड करायचा आणि ते रेकॉर्डिंग तो त्याच्या मित्रांना पाठवत होता.
धक्कादायक म्हणजे जो कॉलेजमध्ये तरुणींना बॉडी शेमिंगदेखील करायचा. त्यांना बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हता. यापूर्वीही आरोपीविरुद्ध विनयभंग, छळ, शारीरिक हल्ला आणि खंडणीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याच्या दुष्कृत्यांबद्दल अनेक लोकांना माहिती होती पण त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मनोजित मिश्रा हा 2022 साउथ कोलकत्ता लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. कॉलेज सोडल्यानंतरही त्यांनी कॅम्पसमध्ये वर्चस्व गाजवलं. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी अलीपूर लॉ कॉलेजमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. अभ्यासादरम्यान तो गुंडगिरीसारखे वागायचा. ज्यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा मारहाणीचे आरोपही लागले आहेत.