Marathi News> भारत
Advertisement

एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश का असतात? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

आपल्याला खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सुरूवातीला पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर केला जायचा.

एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश का असतात? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

मुंबई : आपल्याला खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सुरूवातीला पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर केला जायचा. परंतु त्यानंतर एस्केलेटरचा शोध लागला आणि मॉल किंवा रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी याचा सर्वाधिक वापर होऊ लागला. सुरूवातीला लोकांना याचा वापर कसा करायचा हे माहित नव्हते. लोक याच्यावरती चढण्यापासून घाबरायचे, परंतु आता रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी एस्केलेटर आल्यामुळे जवळ-जवळ सगळ्याच लोकांना याची सवय झाली आहे.

एस्केलेटरच्या दोन्ही बाजुला तुम्हाला ब्रश दिसले असतील, परंतु ते ब्रश का दिलेले असताता, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? याबद्दल बऱ्याच लोकांचं हे म्हणणं असतं की, ते एस्केलेटर साफ करण्यासाठी मदत करतं. एवढंच काय तर अनेक लोकं असे देखील म्हणतात की, आपल्या चपला, बुट साफ करण्यासाठी ते ब्रश असतात. परंतु तुम्हाला यामागील खरं कारण माहित आहे का?

fallbacks

एका अहवालानुसार, एस्केलेटरवर पिवळ्या रंगाच्या रेषाजवळ ब्रश लावलेले असतात. या पिवळ्या रंगाचा अर्थ असा आहे की, एस्केलेटरवर चढताना, या चिन्हापासून आपला पाय दूर ठेवा. त्यानंतर आता हे ब्रशचे काय काम करते हे समजून घेऊ. दोन्ही बाजूंचा ब्रश मानवी कपडे आणि इतर पातळ वस्तूंना एस्केलेटरमध्ये अडकण्यापासून रोखतो.

fallbacks

एस्केलेटरवरील ब्रश हे सेफ्टी फीचर म्हणून काम करतात. हा ब्रश चेतावणीसारखा आहे. सोप्या भाषेत समजून घ्या, तुमचा पाय पिवळा चिन्ह ओलांडून त्या ब्रशजवळ पोहोचताच, हा ब्रश तुम्हाला सुचना देतो पाय दूर ठेवणे आवश्यक आहे आणि तो तुमचा पाय तेथे टच होऊ देत नाही.

एस्केलेटर वापरताना अनेकजण या ब्रशने शूज स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु करणे टाळा कारण यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे एस्केलेटर वापरताना काळजी घ्या.

Read More