Kolkata Rape: कोलकातामधील 24 वर्षीय तरुणीवर बलात्कारावर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण मुखर्जी यांनी केलेल्या विधानामुळे भाजपा संतापली असून, त्यांच्यावर टीका करत आहे. कल्याण मुखर्जी यांनी बलात्कारावर बोलताना केलेलं विधान लज्जास्पद असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. "जर मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करत असेल तर काय करु शकतो? शाळंमध्ये पोलीस असणार का? हे एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थिनीसोबत केलं आहे. तिची कोण सुरक्षा करणार?," असं कल्याण मुखर्जीने म्हटलं आहे. "हे सर्व गुन्हेगारी आणि छेडछाड कोण करतं? काही पुरुष ते करतात. तर, महिलांनी कोणाविरुद्ध लढावे? महिलांनी या विकृत पुरुषांविरुद्ध लढावे," असंही ते म्हणाले आहेत.
कल्याण मुखर्जी यांच्या विधानावर टीका केली जात आहे. कायदा आणि सुरक्षाव्यस्थेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्य आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतील संबंधांवर चर्चा करण्यास बॅनर्जी यांनी नकार दिला. गुन्हा हा कोणत्याही पक्ष किंवा संघटनेपुरता मर्यादित नाही असं ते म्हणाले.
"मी पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे. ज्याने हे केले आहे त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. पण जर एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर तो भ्रष्टाचार कसा असू शकतो?", असं ते म्हणाले आहेत. "सुरक्षेची स्थिती सर्वत्र सारखीच आहे. जोपर्यंत पुरुषांची मानसिकता अशीच राहील, तोपर्यंत या घटना घडत राहतील. तुमचा (पत्रकाराचा) राजकीय अजेंडा आहे, म्हणूनच तुम्ही तुमचा प्रश्न विचारण्यासाठी हा माईक आणला आहे," असाही आरोप त्यांनी केला.
TMC MP comes out in support of rapists!
— BJP West Bengal (@BJP4Bengal) June 27, 2025
In Kasba, a college student has been gang-raped by a TMCP leader and his gang. But TMC MP Kalyan Banerjee calls women’s safety concerns a mere “political agenda.”
In the RG Kar rape case, as Bengal rose in protest through “Raat Jago,”… pic.twitter.com/GL0r9TM0ee
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सुरक्षा रक्षकाच्या खोलीत बलात्कार होत असताना इतर दोन आरोपी उभे राहून पाहत होते अशी माहिती दिली आहे. गुरुवारी संध्याकाळी मुलीने तक्रार दाखल केली असून त्यात दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या बैठकीनंतर संध्याकाळी 7.30 वाजता तीन आरोपींनी- ज्यांना ती फक्त 'J', 'M' आणि 'P' या आद्याक्षरांनी ओळखत होती - तिला घेरलं. तिने म्हटलं आहे की 'M' आणि 'P' ने तिला 'J' असलेल्या खोलीत कोंडले आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
"मी त्यांना लढा दिला, मी रडले आणि मला सोडून देण्याची विनंतीही केली. मी त्यांच्या पायाही पडले, पण त्यांनी जाऊ दिलं नाही," असं पीडितेने पोलिसांना सांगितलं. "लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतूने त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मी त्यांना सतत मागे ढकलत होते. मी हे करु शकत नाही, माझा प्रियकर आहे आणि माझं त्यावर प्रेम आहे सांगत होते," असंही तिने म्हटलं.
माझ्यावर अत्याचार होत असताना, मला पॅनिक अटॅक आला. मी त्यांच्याकडे इनहेलरदेखील मागितला होता अशी माहिती तिने दिली आहे. "मला पॅनिक अटॅक आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. मग 'जे' ने 'एम' आणि 'पी' ला आत येण्यास सांगितले. मी मदत मागितली पण ते मला मदत करत नव्हते. मग मी त्यांना माझ्यासाठी इनहेलर आणायला सांगितलं. 'एम' ने ते आणलं. मी ते घेतल्यानंतर बरं वाटलं," असं ती म्हणाली आणि पोलिसांना सांगितलं की तिने बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पण पीडितेच्या माहितीनुसार, आरोपींनी तिला पकडलं आणि हल्ला सुरुच ठेवला. मुख्य गेट लॉक होता आणि सुरक्षारक्षकानेही मदत केली नाही असंही ती म्हणाली आहे.
तिने सांगितलं की तिला नंतर गार्डच्या खोलीत नेण्यात आले (गार्डला बाहेर काढण्यात आलं). जिथे "'जे' ने माझे कपडे उतरवले आणि माझ्यावर बलात्कार करायला सुरुवात केली. मी विरोध केला असताना त्याने मला ब्लॅकमेल केलं. जर कोणाकडे वाच्यता केली तर कुटुंब आणि प्रियकराला मारुन टाकू असं त्यांनी धमकावलं होतं असं तिने सांगितलं आहे.