Marathi News> भारत
Advertisement

चारा घोटाळा : तिस-या प्रकरणात लालू यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

चारा घोटाळा : तिस-या प्रकरणात लालू यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

रांची : सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

याप्रकरणी लालू यादव यांच्यासह बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच दोघांनाही ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. या प्रकरणाचा युक्तीवाद १९ जानेवारीला पूर्ण झाला होता आणि कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. 

माजी मुख्यमंत्री मिश्राही दोषी

या प्रकरणात लालू यादव यांच्यासोबत बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांनाही ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय आर्थिक गुन्हे शाखेनुसार, ९५० कोटी रूपयांच्या चारा घोटाळा संबंधी चाईबासा कोषागारातून ३५ कोटी ६२ लाख रूपये चुकीच्या मार्गाने काढल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. 

लालू यादव आधीच तुरुंगात

देवघर कोषागार प्रकरणासाठी लालू यादव आधीच साडे तीन वर्षांची शिक्षा भोगत आहेत. ते सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. गेल्या ६ जानेवारीला सीबीआयच्या कोर्टाने लालू यादव यांनी शिक्षा सुनावली होती.  

Read More