Marathi News> भारत
Advertisement

लालू यादव कैदी नंबर ३३५१

सीबीआयच्या विशेष कोर्टाने चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर लालू यादव यांना ताबडतोब पोलिसांनी अटक केली. त्यांना रांची येथील के बिरसा मुंडा जेलमध्ये ठेवण्य़ात आलं आहे.

लालू यादव कैदी नंबर ३३५१

नवी दिल्ली : सीबीआयच्या विशेष कोर्टाने चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर लालू यादव यांना ताबडतोब पोलिसांनी अटक केली. त्यांना रांची येथील के बिरसा मुंडा जेलमध्ये ठेवण्य़ात आलं आहे.

जेलमध्ये व्हीव्हीआयपी सुविधा

लालू यादव यांना अप्पर डिवीजन सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. लालूंना या जेलमध्ये व्हीआयपी सुविधा मिळणार आहे. जेलमध्ये लालू यादव यांना ज्या खोलीत ठेवण्यात आलं आहे त्या खोलीत टॉयलेट आणि बाथरूमची सुविधा आहे. खोलीमध्ये एक खाट, चादर, उशी आणि मच्छरदाणी देखील  आहे. खोलीत एक टीव्ही देखील आहे.

कैदी नंबर 3351

लालू यादव यांचा कैदी नंबर 3351 आहे. रात्री जेवणात लालूंना पालकची भाजी आणि पोळी मिळाली. जेल मॅनेजमेंटला तेजस्वी यादव यांनी लालूंना घालण्यासाठी कुर्ता आणि उबदार कपडे देखील दिले. सोबतच त्यांची औषधं देखील दिली. जेलमध्ये लालूंनी कोणासोबतही काहीही चर्चा नाही केली. ते शांत होते. लालूंना जेवण बनवण्याची देखील सुविधा आहे. त्यांना बाहेरुन देखील जेवण मागवता येऊ शकतं.

पुन्हा त्याच तुरुंगात

लालू यादव यांना तुरुंगात नेत असताना त्यांच्यासोबत आरजेडीच्या कार्यकर्त्यांच्या शेकडो गाड्या होत्या. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लालू यादव यांना 3 ऑक्टोबर 2013 रोजी याच तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. 13 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने त्यांना जमीन दिला होता. यावेळेस देखील त्यांना याच जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. लालू यादव यांच्यासह 22 जणांवर आरोप होते. पण यामध्ये ७ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 15 जणांना मात्र 3 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे.

Read More