Marathi News> भारत
Advertisement

आणखी एका राजकीय नेत्याचं गुडघ्याला बाशिंग, बालपणीच्या मैत्रिणीसोबत चढणार बोहल्यावर

 आता राजकीय वर्तुळात आणखी एक नेत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. 

आणखी एका राजकीय नेत्याचं गुडघ्याला बाशिंग, बालपणीच्या मैत्रिणीसोबत चढणार बोहल्यावर

नवी दिल्ली: सध्या सगळीकडेच लग्नाचं वातावरण आहे. अगदी आपल्या जवळच्या नातेवाईकांपासून ते राजकीय नेते आणि सेलिब्रिटींपर्यंत अनेक ठिकाणी लग्नसोहळे सुरू आहेत. विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाची चर्चा आहे. तर दुसरीकडे ठाकरे घराण्यात नवी सून येणार आहे. तर आता राजकीय वर्तुळात आणखी एक नेत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. 

बिहारमधील नेता तेजस्वी यादव विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत बोहल्यावर चढणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये तेजस्वी यादव यांचा साखरपुडा होणार आहे. या साखरपुड्याची सगळी तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.

तेजस्वी यादव यांची होणार बायको कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तेजस्वी यादव यांची होणारी पत्नी देखील राजकीय घरण्याशी संबंधीत असल्याची माहिती मिळाली आहे. दोघंही पटना इथे एकाच शाळेत होते. शाळेपासून दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. 

fallbacks

मैत्री प्रेमात बदलली आणि अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. त्यांचं लग्न हरियाणामध्ये होऊ शकतं असं सांगितलं जात आहे. या  साखरपुड्यासाठी केवळ खास जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रण देण्यात आलं आहे.

Read More