Tamil Nadu Drops Rupee Symbol : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी X च्या माध्यमातून पोस्ट करत तामिळनाडू सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. रुपयाचं राष्ट्रीय मान्यता असणारं चिन्हं नाकारण्याच्या मुद्द्यावरून हे वादंग माजलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पाच्या आधी रुपयाचं चिन्ह (₹) याऐवजी रुबई या शब्दातील 'रु' वापरण्याचा निर्णय अर्थसंकल्पासाठी वापरण्यासाठी घेतला.
14 मार्चला तामिळनाडूच्या विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधी अर्थसंकल्पासाठी (₹) हे चिन्ह न घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.
केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये साधारण गेल्या महिन्याभरापासून भाषेच्या मुद्द्यावरून मतभेद पाहायला मिळत आहेत. केंद्राच्या नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत ट्राय लँग्लेवज पॉलिसी लागू करण्यास सांगण्यात आलं. ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी शिवाय स्थानिक भाषेचाही समावेस असला तरीही तामिळनाडू सरकारनं मात्र केंद्राच्या या धोरणाचा विरोध केला होता.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना या बदलाची माहिती मिळताच त्यांनी अतिशय बोचऱ्या शब्दांत टीकेची झोड उठवली. द्रमुकला विरोध करायचाच होता तर, मग तो 2010 मध्येच का नाही केला जेव्हा काँग्रेसप्रणित युपीएस सरकारनं हे चिन्हं देशात लागू केलं होतं आणि केंद्रातील सरकारशी द्रमुकची युती होती? असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला.
विरोधाभासानं ‘₹’ हे चिन्हंच मुळात धर्मलिंगमचे माजी आमदार डी उदय कुमार यांच्या मुलानं तयार केलं होतं. आताच्या घडीला हे चिन्हं मिटवणं म्हणजे फक्त राष्ट्रीय चिन्हाची मान्यताच नाकारणं नव्हे, तर तामिळ तरुणाईच्या कलात्मकतेला नाकारण्यासारखं आहे.... असा टोलाही सितारमण यांनी लगावला.
The DMK government has reportedly removed the official Rupee symbol ‘₹’ from the Tamil Nadu Budget 2025-26 documents, which will be presented tomorrow.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) March 13, 2025
If the DMK (@arivalayam) has a problem with ‘₹’, why didn’t it protest back in 2010 when it was officially adopted under the…
₹ हे चिन्ह भारतीय चलनातील रुपयांसाठी 15 जुलै 2010 पासून वापरलं जातं आहे. याच दिवशी केंद्र सरकारने हे चिन्ह जाहीर केलं होतं. या चिन्हापूर्वी Rs किंवा Re या चिन्हांचा वापर होत होता. हे चिन्ह राष्ट्रीय चलनाचं चिन्ह म्हणून भारतातल्या राज्याने नाकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.