Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : जेव्हा बिबट्याची शिकार कोणी तिसराच घेऊन जातो...

जर त्यांच्या पुढ्यातील शिकाराला कोणी घेऊन गेलं तर कसं चालेल? 

Viral Video : जेव्हा बिबट्याची शिकार कोणी तिसराच घेऊन जातो...

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्यापैकी प्रत्यकजण सोशल मीडियावरती फारच ऍक्टीव्ह असतो. आपल्याला त्यावर हवे ते कंटेन्ट पाहायला मिळतात. मग ते लाईफस्टाईल असो, ट्रॅव्हल असो किंवा मजेदार व्हिडीओ. लोकं ते गंमतीने पाहताता आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करतात. सोशल मीडियावरती सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही त्याची धस्ती घ्याल.

जंगलातल्या प्राणांचा शिकार करणं हा एक पेशा आहे आणि ते अगदी कुशलतेनं आपलं शिकार शोधताता आणि करतात देखील. परंतु त्यानंतर जर त्यांच्या पुढ्यातील शिकाराला कोणी घेऊन गेलं तर कसं चालेल? त्यात बिबट्यासमोर असं कृत्य करण्याची हिंमत कोणीच करु शकणार नाही. परंतु जर असं कोणी केलं तर तुम्हाला काय वाटेल बिबच्यानं काय केलं असावं?

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन बिबट्या आपल्या शिकारासमोर बसले आहेत. परंतु तेवढ्यात एक माणूस येतो आणि त्याच्या समोरील शिकार घेऊन जातो. हा व्यक्ती हा शिकार घेऊन जात असताना बिबट्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत.

हा व्यक्ती बिबट्याची शिकार घेऊन जाताना बिबट्या फार उग्र प्रतिक्रिया देतो. त्यानंतर हा व्हिडीओ तेथेच संपते. त्यामुळे पुढे या माणसासोबत काय होत असेल असा लोकांना प्रश्व पडला आहे.

हा व्हिडीओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित आहेत की, त्या व्यक्तीमध्ये एवढी हिंमत कुठून आली, ज्याने बिबट्याच्या समोरून त्याचे अन्न हिसकावून घेण्याचे धाडस केले. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओबद्दल काही माहिती

ही व्हिडिओ क्लिप 12 चित्यांच्या शॉर्ट फिल्मचा भाग आहे, जो चित्रपट दिग्दर्शक सीन विलजोएनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही लवकरच 12 बिबट्यावर एक शॉर्ट फिल्म रिलीज करणार आहोत.'

20 डिसेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. ही व्हिडीओ क्लिप पाहिल्यानंतर डझनभर युजर्सनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने कमेंट करून विचारले आहे की, 'हा माणूस बिबच्याची शिकार त्याच्या समोरुन का घेऊन जात आहे?' त्याचवेळी दुसरा युजर म्हणतो की, 'त्याच्या पुढच्या टीझरमध्ये आपण या व्यक्तीला त्या बिबट्याच्या हातून मरताना पाहणार आहोत.'

Read More