Marathi News> भारत
Advertisement

सर्वसामान्यांना मोठा झटका! पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला

घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे.  आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे.

सर्वसामान्यांना मोठा झटका!  पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला

LGP Gas Price Hike : सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. 

घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही गॅस सिलेंडरची दरवाढ लागू होणार आहे. सध्या मुंबईसह आसपासच्या शहरात घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर 802 रुपये आहेत. दरवाढ लागू झाल्यानंतर ग्राहकांना एका  सिलेंडरसाठी 825 रुपये मोजावे लागणार आहेत. आज मध्यरात्री पासून ही दरवाढ लागू होणार आहे. 

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ करण्यात आलीय. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच राहणार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही असे सांगितले जात आहे.

 

Read More