Marathi News> भारत
Advertisement

LIC Policy | फक्त 1302 रुपयांच्या प्रिमियममध्ये मिळवा 27.60 लाख रुपये; एलआयसीची सुपरहीट पॉलिसी

एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी फायदेशीर योजना आणल्या आहेत. या योजनांच्या आधारे तुम्ही तुमचे आणि कुटूंबाचे भविष्य सुरक्षित करू  शकता.

LIC Policy | फक्त 1302 रुपयांच्या प्रिमियममध्ये मिळवा 27.60 लाख रुपये; एलआयसीची सुपरहीट पॉलिसी

नवी दिल्ली : एलआयसीने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी फायदेशीर योजना आणल्या आहेत. या योजनांच्या आधारे तुम्ही तुमचे आणि कुटूंबाचे भविष्य सुरक्षित करू  शकता. अशीच एक पॉलिसी आहे जीवन उमंग पॉलिसी! ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी एक एंडोमेंट प्लॅन आहे. जीवन उमंग पॉलिसी इतर पॉलिसीपेक्षा वेगळी आहे. ही पॉलिसी तुम्ही 90 दिवसांपासून ते 55 वर्षे वयापर्यंतचे लोक घेऊ शकतात. यामध्ये लाईफ कव्हर सोबतच मॅच्योरिटीवर एकत्रित रक्कम मिळते. मॅच्योरिटी पूर्ण झाल्यानंतर फिक्स्ड इनकम दरवर्षी तुमच्या खात्यात जमा होईल. 

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला एकत्रित रक्कम मिळेल. या स्किमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 100 वर्षापर्यंत कवरेज मिळते.

27.60 लाखांचा परतावा
जर पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिन्याला 1302 रुपयांचा प्रीमियम भरत असाल तर, तर एका वर्षात ही रक्कम 15298 रुपये होते. जर ही पॉलिसी 30 वर्षापर्यंत सुरू असेल तर, तुमचे 4.58 लाख रुपये गुंतवले जातील. 31 व्या वर्षापासून 100 वर्षापर्यंत 40 हजार रुपये वार्षिक परतावा मिळतो. 100 वर्ष परताव्याच्या लाभाचा विचार करता 27.60 रुपयांची रक्कम पॉलिसीधारकाला किंवा नॉमिनीला प्राप्त होते.

Read More