Marathi News> भारत
Advertisement

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवीन लष्कर प्रमुख

मनोज नरवणे यांच्या नंतर मनोज पांडे (Lt Gen Manoj Pande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवीन लष्कर प्रमुख

नवी दिल्ली : भारताचे नवीन लष्कर प्रमुख (Army Chief) लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे असणार आहेत. मनोज नरवणे यांच्या नंतर मनोज पांडे (Lt Gen Manoj Pande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर प्रमुख बनणारे ते पहिले इंजिनीअर आहेत. मनोज मुकुंद नरवणे (General MM Naravane) यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जनरल एमएम नरवणे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर मानले जात आहेत.

39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती.

डिसेंबर 1982 मध्ये लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त करण्यात आले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी लेफ्टनंट जनरल मोहंती यांच्याकडून लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला जे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.

ऑपरेशन पराक्रम दरम्यान, त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेसह संवेदनशील पलियनवाला सेक्टरमध्ये एका अभियंता रेजिमेंटचे नेतृत्व केले. त्यांनी स्टाफ कॉलेज, कॅम्बर्ली (युनायटेड किंगडम) येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच, हायर कमांड (एचसी) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) कोर्सेसमध्ये भाग घेतला.

Read More