Marathi News> भारत
Advertisement

जनधन खातेधारकांनी त्वरीत करा हे काम अन्यथा 1.30 लाखाचे होईल नुकसान

 जर तुम्ही जनधन खातेधारक असाल तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जनधन खातेधारकांसाठी सरकारने आदेश जारी केले आहे.  

जनधन खातेधारकांनी त्वरीत करा हे काम अन्यथा 1.30 लाखाचे होईल नुकसान

मुंबई : जर तुम्ही जनधन खातेधारक असाल तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जनधन खातेधारकांसाठी सरकारने आदेश जारी केले आहे.  आदेशाचं पालन न केल्यास तुम्हाला 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. यासाठी तुम्हाला आपले जन-धन खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.

असे मिळतील 1.30 लाख रुपये
सरकारच्या विशेष योजनांमध्ये जन-धन योजनेच्या खातेधारकांना 1 लाख रुपयांचा एक्सिडेंटल विमासुद्धा मिळू शकतो. परंतु जर खातेधारकाचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर या विम्याचा तुम्हाला फायदा होणार नाही.

म्हणजेच या विम्यासंदर्भात तुमचे 1 लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय खातेधारकारकाला 30 हजार रुपयांचा अपघाती विमा मिळतो. जर आधार कार्ड लिंक नसेल तर हा फायदा देखील खातेधारकाला मिळू शकत नाही.

खात्याला आधारशी करा लिंक
1 तुम्ही बँकेत जाऊन आधारला लिंक करू शकता
2 यासाठी आधारकार्डची एक फोटो कॉपी अन् तुमचे पासबुक घेऊन जा.
3 अनेक बँका मॅसेजच्या माध्यमातूनच आधार लिंक करण्याची सुविधा देत आहेत
4 जवळच्या एटीएम(ATM)च्या माध्यमातूनही बँक खात्याला लिंक करता येते

हे कागदपत्र ठेवा सोबत
यासाठी तुमच्याकडे काही महत्वाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, पॅन कार्ड, वोटर कार्ड इत्यादी

Read More