Fact Check : माणसांनी जंगलांवर अतिक्रमण केल्यामुळे वाघ, सिंह असे प्राणी मानवी वस्तीत शिरल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. अशातच सध्या गुजरातच्या अमरेली भागातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात एक सिंह निर्माणाधीन असलेल्या इमारतीत प्रवेश करतो, एवढंच नाही तर वरच्या मजल्यावर चढून तिथे झोपलेल्या कामगारांना सुद्धा उठवताना दिसतोय. जंगलाचा राजा असलेला सिंहाची गर्जना आणि त्याला इतक्या जवळ पाहिल्यावर कामगारांनी तेथून धूम ठोकली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओचं सत्य नेमकं काय हे जाणून घेऊयात.
व्हिडिओमध्ये गुजरातच्या धारी जिल्ह्यातील अमरेली भागात निर्माणाधीन असलेल्या इमारतीत प्रवेश सिंह प्रवेश करताना दिसतो.
"A lion was spotted at a construction site in Dhari, Amreli district, Gujarat — a rare moment where the wild meets the built world. Dhari, known for its Kesar mangoes and Asiatic lions, stands as the capital of East Gir Forest — where nature still rules."RajatBhargavaIAS pic.twitter.com/oplHlXs0DX
— Dr Rajat Bhargava IAS (rajatias) June 24, 2025
संबंधित व्हिडीओ हा AI जनरेटेड असून तो मुळतः टिकटॉक वापरकर्त्याने बनवलेला असून त्याने व्हिडीओला अशा प्रकारे लेबल लावले. अमरेली येथे अशी घटना घडल्याची पुष्टी कोणतीही विश्वासार्ह बातमी अहवालात दिली नाही. त्यामुळे व्हिडीओमध्ये करण्यात आलेला दावा हा खोटा असल्याचं समोर आलं आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ बारकाईने तपासाला असता यातील बऱ्याच दृश्यांमध्ये विसंगती आढळली. व्हिडीओमध्ये सिंहाच्या शरीराचे काही भाग अंशतः अदृश्य दिसतात. एका क्षणी, दोन सिंह दिसतात पण त्यातील एक रहस्यमयपणे अदृश्य होतो. या व्हिज्युअल ग्लिचेसमुळे हा व्हिडीओ एआय किंवा डिजिटल संपादन साधनांचा वापर करून तयार केला गेलाय हे समजते.
हेही वाचा : गर्लफ्रेंडच्या वडिलांना फसवायला गेला अन् शेतात त्याचाच मृतदेह सापडला; 21 वर्षाच्या हर्षसोबत नेमकं काय झालं?
व्हिडीओ AI जनरेटेड आहे की नाही हे तपासण्यासाठी सायनालायटिक्स आणि डीपफेक-ओ-मीटर हे सॉफ्टवेअर वापण्यात आले. या दोन्ही सॉफ्टवेअरनी केलेल्या विश्लेषणात हा व्हिडीओ बनावट असल्याचं समोर आलंय.
व्हायरल व्हिडीओवर @ataquesferoz हा वॉटरमार्क आहे. तेव्हा @ataquesferoz हा किवर्ड सर्च केला असता @ataquesferoz वापरकर्त्याने टिकटॉकवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला. त्याने सुद्धा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचं लेबल लावलं होतं.