Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : पवित्र नगरी रामभूमी अयोध्येत श्रीरामांचं आगमन होणार आहे. सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram lala Pran Pratishtha) करण्यात येणार आहे. अयोध्येत या ऐतिहासिक राम मंदिर उदघाटन सोहळ्यासाठी (Ram Mandir Inaugration) तयारी पूर्ण झाली आहे.
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर सायबर हल्ल्याचं सावट निर्माण झालं आहे. रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या थेट प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याची धमकी मिळाली असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या आहे. सरकारी संकेतस्थळे आणि पोर्टल्सच्या सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.
सोशल मीडियावर रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासंदर्भात असंख्य बातम्या, फोटो अन् व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या सोहळ्यासंदर्भात चुकीच्या बातम्याही पसरत असल्याचं समोर आलंय. याविरोधात आता केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Information And Broadcasting Ministry) यासंबंधीचे एक परिपत्रक जारी केलंय. सोशल मीडियावर काही असत्य, चिथावणीखोर आणि दिशाभूल करणारे संदेश व्हायरल होताना दिसत आहे. हे संदेश जातीय सलोखा आणि सार्वजनिक कायदा सुव्यवस्था बिघडू शकतात म्हणून अशा खोट्या बातम्या पसरवू नका, असं आवाहन या परिपत्रकातून केलं आहे.
22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी रामलल्लाचा फोटो लीक झाल्याने अधिकाऱ्यांमध्ये घबराहट आहे. कारण फोटो लिक प्रकरणी अधिकाऱ्यांवर श्री राम मंदिर ट्रस्ट कारवाईत करणार आहे. ट्रस्टला संशय आहे की सोशल मीडियावर व्हायरल झालेला रामललाचा फोटो एल अँड टी अधिकाऱ्यांनी लीक केला आहे.
रामलल्ला यांची भव्य सुंदर मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा घर बसल्या कुठे पाहता येणार याची संपूर्ण माहिती खालील लिंकमध्ये दिलेली आहे.
अयोध्येतील श्री रामजन्मभूमीमध्ये रामभक्तांचा मेळावा पाहिला मिळत आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी मंगल ध्वनी वादन होणार आहे. विविध राज्यांतील 50 हून अधिक मनमोहक वाद्ये सुमारे 2 तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार बनणार आहे.
भक्ति भाव से विभोर अयोध्या में श्री राम जन्मभूमि पर होने वाली प्राण प्रतिष्ठा समारोह में प्रातःकाल 10 बजे से 'मंगल ध्वनि' का भव्य वादन होगा। 50 से अधिक मनोरम वाद्ययंत्र, विभिन्न राज्यों से, लगभग 2 घंटे तक इस शुभ घटना का साक्षी बनेंगे। अयोध्या के यतीन्द्र मिश्र इस भव्य मंगल वादन… pic.twitter.com/hvWWbWTZiP
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 21, 2024
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातील लोक अयोध्येत दाखल होत आहेत. जवळपास सर्व हॉटेल्स आगाऊ बुक झाले आहेत. हॉटेलच्या खोलीचे भाडे पाच पटीने वाढविण्यात आले आहेत. रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला देशभरातून सुमारे 3 ते 5 लाख भाविक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्या हॉटेल्सच्या उद्घाटनाच्या तारखेसाठी अजूनही खोल्या उपलब्ध आहेत त्यांच्या किमती पूर्वीपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, आपत्ती रुग्णालय भीष्मची टीम 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यात अयोध्येत उपस्थित राहणार आहे.
रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारल्याबद्दल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'संपूर्ण देश हा उत्सव साजरा करत आहे. जगभरातील लोक आनंदी आहेत. काँग्रेस स्वतःसाठी समस्या निर्माण करत आहेत.'
ऑस्ट्रेलियानंतर अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी लंडनमध्येही रामभक्तांनी कार रॅलीचं आयोजन केलं होतं.
#WATCH | UK: Members of Indian diaspora in London organised a car rally ahead of the Ram temple 'Pran Pratishtha' ceremony in Ayodhya pic.twitter.com/l5jf3q2fXx
— ANI (@ANI) January 20, 2024
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अयोध्येत जोरदार तयारी केलीय. SDG कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनीही यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. अयोध्येत मोठ्या संख्येने यात्रेकरू आधीच उपस्थित आहेत, जे धार्मिक स्थळे, धर्मशाळा आणि आश्रमांमध्ये मुक्काम करत आहेत. त्या धर्मशाळा व आश्रम इत्यादींच्या व्यवस्थापकांशी बोलून सर्व भाविकांनी एकत्र दर्शनाला जाऊ नये अशी विनंती, प्रशांत कुमार यांनी केली आहे. 22 जानेवारीनंतर दर्शनाची व्यवस्था क्रमाने करण्यात यावी.
प्रभू रामाच्या मूर्तीला आज 114 कलशांच्या पाण्याने दिव्य स्नान करण्यात येणार आहे. आज रामलल्लाच्या मंडपाचीही पूजा होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं आहे की, आज देवतांची पूजा, हवन, पारायण इत्यादी, सकाळी मध्वधिवास, 114 वरून विविध औषधी पाण्याने मूर्तीचं स्नान होणार आहे. कलश, महापूजा. उत्सवमूर्तीची प्रसाद परिक्रमा, शय्याधिवास, तत्लन्यास, महान्यास आदिन्यास, शांत-पोषण-अघोर होम, व्याहती होम, रात्रीची जागर, सायंकाळची पूजा आणि आरती होईल.
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 21, 2024
उत्तर प्रदेशातील कटरा आणि अयोध्या दरम्यान सरयू नदीवरील रेल्वे पूल रात्रीच्या वेळी मंत्रमुग्ध करणाऱ्या दिव्यांनी उजळून निघालं आहे.
The railway bridge over Saryu River between Katra and Ayodhya in Uttar Pradesh glows up with mesmerising lighting at night: Ministry of Railways pic.twitter.com/jR0tiITWCe
— ANI (@ANI) January 20, 2024
22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी अख्खा देश राममय झाला आहे. मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर आकर्षक रोषणाई करुन रामाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
Mumbai: Lord Ram's image lit up Bandra-Worli sea link ahead of Pran Prathishta
Read @ANI Story | https://t.co/TcPgx9Fs8p#bandraworlisealink #RamMandirPranPratishta pic.twitter.com/Hu63PXhRpU
— ANI Digital (@ani_digital) January 20, 2024
नेपाळमधील जनकपूर, माता सीतेचे मूळ गाव रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रकाशमय झालंय. माता सीतेचे जनकपूर 'राम नाम'ने गुंजलंय.
Nepal: Janakpur echoes in 'Ram Naam' ahead of Pran Pratishtha ceremony in Ayodhya
Read @ANI Story | https://t.co/8Plm1B1LLO#AyodhyaRamMandir #Janakpur #PranPatishtha pic.twitter.com/Acliof7iyk
— ANI Digital (@ani_digital) January 21, 2024
या ऐतिहासिक क्षणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. अयोध्येला जाणं सगळ्यांना शक्य नाही. अशावेळी घरु बसून रामलल्लाची पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेली लिंक पाहा
अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी मंदिराची आकर्षित सजावट करण्यात आली आहे. या मंदिराला 2500 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. ही फुलं खास करुन थायलंड आणि अर्जेंटिनावरुन मागविण्यात आली आहे. तर गुजरातच्या माळी समाजाने सात राज्यांतून 300 क्विंटल फुलं पाठवली आहेत.
अवधपुरी प्रभु आवत जानी।
भई सकल सोभा कै खानी॥ pic.twitter.com/KE8WMfPoyr— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 20, 2024
रामलल्ला यांचा चेहरा समोर आल्यानंतर शिल्पकार अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता योगीराज यांनी एक वक्तव्य केलंय. त्या म्हणाल्या की, रामलल्लाच्या मूर्तीचं अंतिम रुप अद्याप समोर आलेलं नाही.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.