Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: मतदारांची वेगळी यादी देणं शक्य होणार नाही; निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टाला उत्तर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 10 August 2025: महाराष्ट्रातील राजकारण, पावसाचे वातावरण तसेच विविध शहरातील महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News Today LIVE:  मतदारांची वेगळी यादी देणं शक्य होणार नाही; निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टाला उत्तर
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 10 August 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता बेंगळुरूतील केएसआर रेल्वे स्टेशनवर ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.आमदार सुनिल शिंदे यांच्या मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस, ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे.जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. नकाश्याशी संबंधित वादानंतर NCERT ने शैक्षणिक पुस्तकांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीला पाठ्यपुस्तकांमधील चुकीची माहिती आणि त्रुटी शोधून त्यात सुधारणा सुचवण्याचे काम सोपवण्यात आले आहेत.

10 August 2025
10 August 2025 20:55 PM

मतदारांची वेगळी यादी देणं शक्य होणार नाही; निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टाला उत्तर

बिहारमधील मतदारयादीतून 65 लाख मते वगळली आहेत. बिहारमधील मतदारयादीचा घोळ कोर्टात पोहोचलाय. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला उत्तर देताना म्हटले की, वेगळी यादी देणं शक्य होणार नाही. कायद्यात तरतूद नाही. मतदारांची एकच यादी असेल. सुप्रीम कोर्टात आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

10 August 2025 20:55 PM

मतदारांची वेगळी यादी देणं शक्य होणार नाही; निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टाला उत्तर

बिहारमधील मतदारयादीतून 65 लाख मते वगळली आहेत. बिहारमधील मतदारयादीचा घोळ कोर्टात पोहोचलाय. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला उत्तर देताना म्हटले की, वेगळी यादी देणं शक्य होणार नाही. कायद्यात तरतूद नाही. मतदारांची एकच यादी असेल. सुप्रीम कोर्टात आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

10 August 2025 20:02 PM

जिल्हा कारागृहात गांजा वाटपावरून राडा, कारागृहातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या

बीड जिल्हा कारागृह कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादाच्या भोवऱ्यात आहे. अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला.. आणि याच गांजा वाटपावरून चार न्यायाधीन बंदिवानात जोरदार राडा झाला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत बंदिवानाच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला. यावरून बंदिवानानी कर्मचाऱ्यानाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्यासह कारागृह वरिष्ठांनी माहिती दिली.

10 August 2025 19:30 PM

नौदलाच्या युद्धनौकांचा 11-12 ऑगस्ट रोजी अरबी समुद्रात सराव

भारतीय नौदलाच्या युद्धनौका 11-12 ऑगस्ट रोजी अरबी समुद्रात सराव करणार आहेत. पाकिस्तान नौदलाने त्यांच्या पाण्यात सराव करण्यासाठी एअरमेनना नोटीस (NOTAM) देखील जारी केल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.

10 August 2025 18:17 PM

ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवायची आयडिया कोणाच्या डोक्यातून?- सतेज पाटील 

आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स लावावा लागणार केंद्र सरकारने हा नवा निर्णय घेतलाय. ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने त्याला कोल्हापुरातून पहिला विरोध करण्यात आलाय. विधान परिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी यांनी पत्रकार बैठक घेवून हा विरोध केलाय. देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर, ट्रॉलीला निर्णय केला बंधनकारक कारण्यात आलाय. त्यामुळे सतेज पाटील यांनी सोशल मिडियावर हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवायची आयडिया कोणाच्या डोक्यातून आली हे कळायला मार्ग नाही. लोकांना आधीच हमीभाव नाहीये त्यात हा 25 हजारांपर्यंत आर्थिक बोजा येणार आहे असं देखील सतेज पाटील यांनी म्हटलंय. EDR आणि GPS ची ट्रॅक्टरला लावायची गरज काय आहे असा सवाल देखील सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय.

10 August 2025 17:04 PM

संशयीत कारचा पाठलाग करताना पोलीसांची गाडी पलटली

संशयित कारचा पाठलाग करताना पोलिसांची गाडी पलटून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. नांदेडमध्ये ही घटना घडली. बारड येथील महामार्ग पोलीस चौकी समोर वाहनांची तपासणी सुरु असताना एका इंडिका विस्टा कारमधून लाल रंगाचे पाणी निघत असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार भरधाव वेगात निघून गेली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. संशयित गाडी गावाकडील छोट्या रस्त्याकडे वळाली. गाडीचा पाठलाग करत असताना पोलिसांचे टाटा सुमो वाहन उलटले. गाडीतील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान संशयित गाडीला तोरणतांडा येथील ग्राणास्थानी पकडले. गाडीचालक आणि अन्य एकाला पकडण्यात आले. या गाडीमध्ये गोमांस आढळले.

10 August 2025 16:46 PM

अतिवृष्टीमुळे आठ महसुली मंडळात पिकांचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका पुसद विभागात बसला असून, दारव्हा, दिग्रस येथे घरांची पडझड झाली आहे. पुसदच्या आरेगाव येथे अतीवृष्टीमुळे शेती पिके पाण्याखाली आली आहे, सोयाबीन व ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. उभा ऊस आडवा पडल्याने ऊत्पादनात मोठी घट येण्याची भिती आहे. तसेच सोयाबीनचे पीक पाण्यात आल्याने शेतकऱ्यांचा खर्च आणि परिश्रम वाया गेले आहे.

10 August 2025 15:51 PM

आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींच चा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. फडणवीस कोणाचेच काम करत नाहीत. गोरगरीब असो ओबीसी असो की मराठा कोणाचे कोणाचेही आरक्षण किंवा काम ते पटकन करत नाहीत. आता त्यांनी ओबीसी साठी लढणार असल्याचं म्हटलं आहे. मग मराठ्यांसाठी कोण लढणार असा सवाल उपस्थित करत गोव्यामध्ये भाजपमधील ओबीसींच्या मेळाव्यात मुंबईला येणाऱ्या मोर्चामध्ये दंगल घडवण्याची आखणी केली असल्याचा अंदाज आहे. मात्र मोर्चामध्ये काही झालं तर फडणवीस जबाबदार असतील अस जरांगे यांनी म्हटलं आहे.

10 August 2025 15:39 PM

अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेला पाडलं खिंडार 

अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेला मोठं खिंडार पाडलं आहे. मनसेच्या जिल्हा संघटक, शहराध्यक्ष आणि शहर संघटकांनी मनसेला रामराम करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळं ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मनसेला मोठा धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगलीये.

10 August 2025 14:18 PM

'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं'! संदीप देशपांडेंच्या टी-शर्टची चर्चा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेला टी-शर्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संदीप देशपांडे हे दादर परिसरात हा टी-शर्ट परिधान करुन फिरत होते. या टी-शर्टवर, 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', असा मजकूर लिहला आहे. हा टी-शर्ट म्हणजे एकप्रकारे मुंबईत राहून मुजोरीची भाषा करणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा असल्याचे सांगितले जाते.

10 August 2025 13:51 PM

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर कुरापती सुरूच, थेट गुप्त करारावर केल्या सह्या, मोठी खळबळ

50 टक्के टॅरिफ कर अमेरिकेकडून लादण्यात आल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये असा धक्कादायक दावा करण्यात आला की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका गुप्त आदेशावर स्वाक्षरी केली, ज्याच्या अंतर्गत अमेरिकेने परदेशातही लॅटिन अमेरिकन ड्रग कार्टेल्सवर लष्करी कारवाई केली जाऊ शकते. जे अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे.

10 August 2025 12:02 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर दौऱ्यावर

जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातुरला जाणार आहेत. ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात स्व. गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. पुतळा लोकार्पणानंतर दयानंद कॉलेज मैदानात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस पहिल्यांदाच लातूर दौऱ्यावर जाणार आहेत.  

10 August 2025 12:01 PM

वासाळी ग्रामपंचायतकडून शरद पवार यांना 'लोकपिता' पदवी बहाल 

इगतपुरी तालुक्यातील वासाळी ग्रामपंचायतकडून ठराव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना लोकपिता ही पदवी बहाल करण्यात आली.

10 August 2025 11:01 AM

खोक्या उर्फ सतीश भोसलेला जामीन मंजूर

खोक्या उर्फ सतीश भोसलेला जामीन मंजूर झाला आहे. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या भोसले विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात त्याला अटक देखील करण्यात आली. सध्या तो बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आला होता. याप्रकरणी अँडव्होकेट राजन धसे यांनी युक्तिवाद केला होता. त्यानुसार शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

10 August 2025 10:59 AM

देहूरोड बंदला संमिश्र प्रतिसाद 60 टक्के दुकाने बंद

देहूरोड कॅन्टोन्मेंटला स्वतंत्र नगरपरिषद दर्जा मिळावा या मागणीसाठी दिलेल्या बंदच्या हाकेला आज देहूरोड मध्ये नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सकाळपासून बाजारपेठेत चढ-उतार जाणवत राहिले. सुमारे 60 टक्के दुकाने बंद राहून बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे तर उर्वरित 40 टक्के दुकाने सुरू आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवला, तर काही भागांत व्यापार सुरूच आहे. देहूरोड मध्ये मोर्चासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता.

10 August 2025 10:58 AM

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी स्वाभिमान सभेचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिवासी सेलच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (SP) नेते शरद पवार यांची असणार प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, रोहित पवार, अमोल कोल्हे, सुनील भुसारा हे देखील उपस्थित राहणार आहेत. या सभेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

10 August 2025 09:45 AM

इंटरनेट, मोबाईल बंद ठेवून पाकिस्तानचं बलुचिस्तानमध्ये मोठं ऑपरेशन

पाकिस्तानच्या सुरक्षादलाने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या बलुचिस्तानमध्ये मोठी कारवाई केली आहे, या कारवाईमध्ये गेल्या दोन दिवसांत किमान 47 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याबाबत पाकिस्तानच्या जनसंपर्क विभाग (आईएसपीआर) नं माहिती दिली आहे. सात ऑगस्टच्या मध्यरात्री बलुचिस्तानच्या झोब जिल्ह्यातल्या सांबाजा भागात सुरक्षादलानं केलेल्या कारवाईमध्ये 33 दहशतवादी ठार झाले आहेत, तर दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये 14 दहशतवाद्यांना मारण्यात आलं. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमध्ये 31 ऑगस्टपर्यंत इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली आहे, सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेतल्याचं येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

10 August 2025 09:15 AM

Maharashtra Weather Update: पुढील आठवडाभर पावसाची हजेरी, डोंगराळ भागात भूस्खलन तर मैदानी भागात पूराचा धोका!

 

10 August 2025 09:00 AM

 केंद्र सरकार नवं इन्कम टॅक्स विधेयक आणणार, 12 लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादा घटणार?

देशातील करप्रणालीत मोठा बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार लवकरच नवं इनकम टॅक्स विधेयक लोकसभेत मांडणार आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त मंत्री निर्मला सीतारमण सोमवार (11 ऑगस्ट 2025) रोजी हे विधेयक मांडतील. या विधेयकात करसवलतीच्या मर्यादेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 12 लाखांपर्यंतच्या करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत कपात होऊ शकते अशी सध्या चर्चा आहे. 

10 August 2025 08:59 AM

अंबरनाथमध्ये मनसेला मोठं खिंडार

अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेला मोठं खिंडार पाडलं आहे. मनसेच्या जिल्हा संघटक, शहराध्यक्ष आणि शहर संघटकांनी मनसेला रामराम करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळं ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मनसेला मोठा धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगलीये.

10 August 2025 07:41 AM

किश्तवारच्या डूल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक 

किश्तवारच्या डूल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून  दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. १० ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे किश्तवारमधील डूलच्या सामान्य भागात गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाई करताना भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांशी संपर्क साधला. गोळीबार झाला. सध्या ऑपरेशन प्रगतीपथावर आहे.

10 August 2025 07:41 AM

पुणे वंदे भारतचा आज शुभारंभ होणार

पुण्यात वंदे भारतचा आज शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूरु येथून ऑनलाईन या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवतील देशातील सगळ्यात लांब पल्ल्याची ही वंदे भारत  ट्रेन असणार आहे.सध्या नागपूरच्या अजनी ते पुणे  (नागपूर) दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस चालवणार आहे.

10 August 2025 06:31 AM

गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज

मुंबई : शाळांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन व दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टयांचा निर्णय राज्य सरकारने ७ ऑगस्टला बदलून गौरी-गणपती व नारळीपौर्णिमा या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे. मुंबईत गणपती विसर्जन आणि दहीहंडी या सार्वजनिक सणांच्या दिवशी शहरातील बहुतांश रस्त्यांवर प्रचंड गर्दी व वाहतूककोंडी होते. गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरतात. त्यावेळी वाहनांचे मार्ग बदलले जातात, तसेच विसर्जन मिरवणुकांमुळे रस्त्यांवर वाहतूक ठप्प होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अपघाताचा धोका संभवतो. या दिवशी सुट्टी न दिल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची राहील, असे शिक्षिका रेखा बोंडे यांनी सांगितले.

10 August 2025 06:30 AM

वकिलांच्या नोंदणीसाठी पर्यायी शुल्क आकारता येणार नाही : सुप्रीम कोर्ट

वकिलांच्या नोंदणीसाठी फक्त कायदेशीर शुल्क घेण्यात यावे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे पर्यायी शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्यांच्या बार कौन्सिल व बार कौन्सिल ऑफ इंडियाला (बीसीआय) दिले आहेत. यासोबतच सुप्रीम कोर्टाने कर्नाटक राज्य बार कौन्सिलला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क घेणे तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

10 August 2025 06:28 AM

अमरनाथ यात्रेची सांगता, ४.२० लाख भाविकांचे दर्शन, 'छडी मुबारक'ची स्थापना करून यात्रा पूर्णतेकडे

जम्मू: अमरनाथ यात्रेची शनिवारीऔपचारिक सांगता झाली असून, १४,५०० फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेत 'छडी मुबारक'ची स्थापना करण्यात आली. ही छडी स्थापना यात्रा पूर्णतेकडे नेणारा महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळा आहे. महंत दीपेन्द्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली दशनामी आखाड्यातून निघालेला साधूंचा जत्था शनिवारी पहाटे पवित्र गुहेत पोहोचला. श्रावण पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर छडी मुबारकची स्थापना होऊन विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. छडी मुबारक आता पहलगामकडे रवाना झाली असून, लिद्दर नदीच्या तीरावर यथाविधी विसर्जन होईल. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि हवामानाच्या बदलत्या स्थितीमुळे काही दिवसांपूर्वीच भाविकांची संख्या कमी झाल्यानंतर यात्रा संथावस्थेत गेली होती. मात्र, आज छडी मुबारकच्या स्थापनेसह यात्रेचा धार्मिक समारोप करण्यात आला.

10 August 2025 06:26 AM

भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा

भारत-पाकिस्तान या देशात चार दिवसांपासून सुरू असलेले युद्ध मीच थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 
हस्तक्षेप केला नसता तर दोन्ही देशांतील संघर्षाचे रूपांतर आण्विक युद्धात झाले असते, अशी भीती हॉइट हाउसमध्ये ट्रम्प यांनी व्यक्त केली. या संघर्षात पाच विमाने पाडली गेल्याच्या दाव्याची त्यांनी पुनरावृत्ती केली. मात्र, ती विमाने कोणत्या देशाची होती याबद्दल त्यांनी कोणतेही विधान केले नाही.

10 August 2025 06:22 AM

उत्तराखंड दुर्घटनेच्या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी धावलेल्या महाजनांना महिलांनी बांधल्या राख्या 

उत्तराखंड येथे दुर्घटनेच्या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांसह भाविकांच्या मदतीसाठी गेलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना पर्यटक महिलांनी राख्या बांधल्या आहेत. उत्तराखंड येथून हरिद्वारे ते सुखरूप पोहोचलेल्या महिला पर्यटकांनी मंत्री गिरीश महाजन यांना विद्युत औक्षण करत राख्या बांधल्या व रक्षाबंधन साजरे केले. मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून उत्तराखंड येथे दुर्घटनेच्या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविक तसेच पर्यटकांना सुखरूप पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येत आहेत. पुणे, मुंबई ,राजगुरुनगर, मंचर ,खेड, नारायणगाव यांसह महाराष्ट्राच्या विविध भागांतील महिला पर्यटक जेव्हा सुरक्षितपणे हरिद्वार येथे पोहोचल्या. उत्तराखंड येथून हरिद्वार येथे पोहोचलेल्या महिला पर्यटकांनी मंत्री गिरीश महाजन यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. महिला आपल्या गावी नसल्यामुळे तर मंत्री गिरीश महाजन सुद्धा मदतीसाठी उत्तराखंड येथे असल्याने रक्षाबंधन कसे साजरे करायचे असा प्रश्न होता? आपापल्या गावी नसताना सुद्धा महिलांबरोबरच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा सुद्धा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनचा साजरा. 

10 August 2025 06:21 AM

नशा व उत्तेजनासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेमीमाईंड औषधी इंजेक्शनचा साठा जप्त ,6 जणांना अटक

नशा आणि उत्तेजककेसाठी बेकायदेशीर वापरल्या जाणाऱ्या ट्रेमीमाईंड औषधी इंजेक्शनचा साठा सांगली पोलिसांनी जप्त करण्यात केला आहे.दोन लाख पंधरा हजार किंमतीचे 558 इंजेक्शने बाटल्या जप्त जप्त करत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.तरुणांकडुन नशा आणि उत्तेजक द्रव्य म्हणून ट्रेमीमाईंड औषधी इंजेक्शनचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सदरचे औषधी इंजेक्शन ही ऑनलाईन मागवून ती सांगली,कवठेमहांकाळ आणि आटपाडी या ठिकाणी ज्यादा दराने विक्री करण्यात येत असल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आली असून शहरातल्या पत्रकारनगर येथे औषधी इंजेक्शन तस्करी करताना संशयिताला पकडत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

10 August 2025 06:17 AM

 सोलापुरातील मार्कंडेय रथोत्सवात मंत्री जयकुमार गोरेंची मुसळधार पावसात भिजत एन्ट्री

सोलापुरातील मार्कंडेय रथोत्सवासाठी मंत्री जयकुमार गोरेंची मुसळधार पावसात भिजत एन्ट्री घेतली आहे. सोलापुरात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्ताने श्री मार्कंडेय महामुनींचा रथोउत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे देखील रथोत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत आ. देवेंद्र कोठेनीं सुद्धा भर पावसात भिजत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथाचे दर्शन घेतले. पालकमंत्र्यांनी भिजत दर्शन घेतल्याने युवकांनी उत्साहात घोषणाबाजी केली. 

10 August 2025 20:53 PM

नुकसान भरपाईपोटी ३० हजार कोटी देणार, सरकारी तेल कंपन्यांना मदतीचा हात

घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडर विक्रीतील नुकसान भरून काढण्यासाठी तीन सरकारी तेल कंपन्यांना केंद्र सरकारने ३० हजार कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरपाई १२ टप्प्यांत दिली जाणार आहे.

10 August 2025 20:51 PM

हॉर्नचा मोह आवरेना मुंबईत 21,492 चालकांवर कारवाई

अनावश्यक हॉर्न वाजवल्यामुळे ध्वनिप्रक्षण होते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो; मात्र मुंबईकरांना हॉर्नचा मोह आवरत नाही. याप्रकरणी 2024 मध्ये वाहतूक पोलिसांनी 21 492 चालकांवर कारवाई केली आहे.

10 August 2025 20:50 PM

एअर इंडिया अपघात प्रकरणात  अमेरिकन कायदा फर्म 65 कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणार

एका अमेरिकन कायदा फर्मने एअर इंडियाच्या विमान अपघातात बाधित झालेल्या 65 कुटुंबांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही कुटुंबे या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावले असून, आता न्याय आणि नुकसानभरपाईसाठी लढत आहेत. फर्मने या प्रकरणात कायदेशीर कारवाई पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

10 August 2025 20:48 PM

नकाशा वादानंतर NCERT कडून पुस्तक तपासणीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन 

नकाश्याशी संबंधित वादानंतर NCERT ने शैक्षणिक पुस्तकांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीला पाठ्यपुस्तकांमधील चुकीची माहिती आणि त्रुटी शोधून त्यात सुधारणा सुचवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. हा निर्णय नकाश्याच्या चुकीच्या चित्रणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.

Read More