Union Budget 2025-26, Nirmala Sitharaman Speech Live News in Marathi: देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या दृष्टीकोनातून एक किंवा दोन दशकं आठ टक्क्यांहून अधिक विकास दर गाठावा लागेल असं स्पष्ट मत देशाच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आलं. त्याच धर्तीवर आता देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये देशातील शेतकरी, महिला, युवा अशा प्रत्येक वर्गाला केंद्रस्थानी ठेवत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कैक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पाहा अर्थसंकल्प सादर करत असताना मिनिटामिनिटाला कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आणि मोदी 3.0 सरकारनं मध्यमवर्गीयांना कशी दिली खास भेट... सर्व अपडेट एका क्लिकवर.
मध्यमवर्ग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्तंभ असून, याच मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवत अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. 2014 मध्ये मध्यमवर्गावरून कराचा भार हलका करण्यात आल्याचं म्हटलं गेलं होतं. ज्यानंतर यंदाही अर्थमंत्र्यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली.
12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.
₹15-20 Lk उत्पन्नावर 20 टक्के कर
₹24 Lk हून अधिक रकमेच्या उत्पन्नावर 30 टक्के कर.
#UnionBudget2025 | "The middle class provide strengths to the economy. In recognition of their contribution, we have periodically reduced the tax burdens. I am now happy to announce that there will be no income tax up to an income of Rs 12 lakhs."says Finance Minister Nirmala… pic.twitter.com/9IVCnhEUb1
— ANI (@ANI) February 1, 2025
12 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर Income Tax नाही. महिन्याला एक लाख रुपये कमवणारे करमुक्त. नोकरदार वर्गासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा.
#UnionBudget2025 | Finance Minister Nirmala Sitharaman says, " I am now happy to announce that there will be no income tax up to an income of Rs 12 lakhs." pic.twitter.com/rDUEulG3b9
— ANI (@ANI) February 1, 2025
ओपन सेलवरील कस्टम ड्यूटी आणखी कमी होणार. जहाजबांधणीसाठीच्या कच्च्या मालावरील अबकारी करात घट. क्रस्ट लेदरवरील आयातशुल्क हटवलं.
आयकर भरण्याची प्रक्रिया सोपी होणार. नवी आकरण प्रणाली आणि विधेयक सोपं असणार. टीडीएसवरील कर कमी होणार.
#WATCH | FM says, "....Inspired by the success, a modified UDAN scheme will be launched to enhance regional connectivity to 120 new destinations and carry 4 crore additional passengers in the next 10 years. The scheme will also support helipads and smaller airports in hilly,… pic.twitter.com/S4UTo7FnCs
— ANI (@ANI) February 1, 2025
सुधारित तरतुदींनुसार FY26 अर्थात पुढील आर्थिक वर्षासाठीचा संशोधित खर्च ₹47.16 Lk Cr इतका असून, अर्थमंत्र्यांनी 7 कस्टम टॅरिफ हटवण्याची घोषणा केली. कस्टम क्लीयरेंस, कार्गो स्क्रीनिंग अधिक वेगानं करेणार. पोस्ट पेमेंट बँकांची व्याप्ती ग्रामीण क्षेत्रांमध्ये वाढवणार. ReKYC प्रक्रिया आणखी सोपी करणार.
कस्टम ड्युटीतून 36 औषध वगळली. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार. केंद्र सरकारचं मोठं पाऊल.
HEAL इन इंडिया अंतर्गत व्हिसा नियम सुकर करणार. एक्सपोर्ट प्रमोशन मिशन सुरु करणार. एक्सपोर्ट अर्थात आयात निर्यात वाढवण्यासाठी MSMEs ना सोप्या प्रक्रियेतून कर्ज दिलं जाणार. ट्रेड फायनान्ससाठी भारत ट्रेड नेटची स्थापना. वेयरहाउस, पोर्ट इंफ्रा क्षेत्रांना बळकटी देणार.
पुढील आठवड्यात मांडणार इनकम टॅक्स विधेयक
#UnionBudget2025 | "I propose to introduce the New Income Tax Bill next week," says FM Nirmala Sitharaman in Parliament pic.twitter.com/yfHIjzyMxu
— ANI (@ANI) February 1, 2025
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी SC/ST प्रवर्गातील महिलांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. पाच वर्षांसाठीच्या या योजनेअंतर्गत महिलांना मदत मिळणार असून, ₹10,000 कोटींचा नवा फंड ऑफ फंड्स तयार होईल.
SMEs साठी क्रेडिट गॅरंटी स्कीम मर्यादेत वाढ. आता ही मर्यादा 10 लाख रुपये इतकी असेल. स्टार्टअप क्रेडिट गॅरंटी 20 लाखांवर. सोशल सिक्योरिटी स्कीमची घोषणा. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर केअर सेंटर सुरु करणार. 5 वर्षांत वैद्यकिय क्षेत्रात 75000 जागांची वाढ करणार. गिग वर्कर्ससाठी सोशल सिक्योरिटी स्कीम सुरु करणार. ऑनलाइन प्लैटफॉर्म वर्कर्सनाही या योजनेचा लाभ मिळणार.
अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री सीतारमण यांनी भारतातील विविध भारतीय भाषांमधील पुस्तकांना प्राधान्य देणार असल्याचं जाहीर केलं. ग्रामीण प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये इंटरनेट सुविधा सुरु करणार असल्याची घोषणा. IIT ची संख्या वाढवणार. AI क्षेत्रात सेंटर ऑफ एक्सीलेंस सुरु करणार.
मागासवर्गीय विभागातील महिलांसाठी एका खास योजनेची सुरुवात करणार. बिहारमध्ये फूड टेक्नोलॉजी आणि व्यवस्थापकीय संस्थेची सुरुवात करणार. नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग योजनेची सुरुवात करणार. सक्षम आंगणवाडी आणि POSHAN 2.0 ची सुरुवात करणार.
कपाशीचं उत्पादन वाढवण्यासाठी पंचवार्षिक योजनेची सुरुवात करणार. पाच वर्षांच्या या विशेष मोहिमेअंतर्गत आसाममध्ये नव्यानं युरिया प्लांट सुरु करण्यात येणार. भारतीय टपाल खातं एक नवं आर्थिक केंद्र आणि संस्था बनणार.
देशात लेबर इंटेंसिव सेक्टर अंतर्गत प्रोत्साहनपर नव्या योजना सुरु करणार असल्याचं सीतारमण यांनी जाहीर केलं. फुटवेअर आणि चर्मोद्योग क्षेत्रासाठी खास योजनेची तरतूद. सदर योजनेअंतर्गत 22 लाखांहून अधिक नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार. खेळण्यांच्या उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर भारत एक केंद्र म्हणून विकसित होणार.
कोऑपरेटिवच्या मदतीनं NCDC ला आर्थिक पाठबळ देणार. MSME मध्ये गुंतवणुकीसह एकूण मालमत्तेत 2.5 पटींनी वाढ होणार. लघुउद्योगांना विशेष क्रेडिट कार्ड देणार. स्टार्टअपसाठी विशेष 20 कोटी रुपयांचं क्रेडिट गॅरंटी कव्हर मिळणार.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आल्याची घोषणा केली. इथून पुढं KCC ची मर्यादा 3 लाखांवरून वाढवून 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना यामुळं थेट लाभ घेता येणार.
डाळींच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी विशेष योजनेची घोषणा. तूर, उडीद आणि मसूर उत्पादगनासाठी 6 वर्षांची विशेष मोहिम. केंद्रिय यंत्रणा पुढील 3 वर्षांमध्ये तूर, उडीद आणि मसूरची खरेदी करणार.
#UnionBudget2025 | Union Finance Minister Nirmala Sitharaman says, "PM Dhan Dhaanya Krishi Yojana - developing agri districts program...Our government will undertake a PM Dhan Dhaanya Krishi Yojana in partnership with states. Through the convergence of existing schemes and… pic.twitter.com/5rQwdGQOqE
— ANI (@ANI) February 1, 2025
या अर्थसंकल्पात महिला, युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना फायदा होईल अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.
- फायनान्शिअल सेक्टरच्या क्रांतीसाठी लक्ष केंद्रीत करणार
- 100 जिल्ह्यांमध्ये धन धान्य योजनेची सुरुवात
- कमी धान्य उत्पन्न असणाऱ्या जिल्ह्यांना धन धान्य योजनेत बळ देणार.
- कृषी योजनेचा तब्बल 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये फोकस ग्रोथला वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जिथं सरकार सर्वांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवेल. मध्यम वर्गाला आर्थिक सुबत्ता देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील. अर्थसंकल्पामध्ये 10 मुद्द्यांवर लक्ष देत खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर देण्यासाठी हाताभार लावण्याची घोषणा.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. तर, काहींनी सभात्याग केला.
राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर अर्थसंकल्प मांडल्यानंतर आता अर्थसंकल्पाला कॅबिनेटकडूनही मंजुरी मिळाली आहे.
#WATCH | President Droupadi Murmu feeds Union Finance Minister Nirmala Sitharaman the customary 'dahi-cheeni' (curd and sugar) ahead of her Budget presentation.
Union Finance Minister Nirmala Sitharaman will present her 8th consecutive #UnionBudget, today in Parliament
(Source… pic.twitter.com/jZz2dNh59O
— ANI (@ANI) February 1, 2025
राष्ट्रपतीभवनातून निघाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यांची टीम संसद भवन परिसरात दाखल झाली आहे, जिथं त्या काही क्षणात देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
#WATCH | #UnionBudget2025 | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman arrives at the Parliament, after meeting President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. She will present Union Budget at the House, shortly. pic.twitter.com/AHO3oBLM8l
— ANI (@ANI) February 1, 2025
स. 9 वाजता - अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेटचा प्रत घेऊन अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनाकडे निघतील.
स. 10 वाजता - निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनातून संसदेकडे निघतील.
स. 11 वाजता - निर्मला सीतारमण संसदेत बजेट सादर करतील.
दु. 4 वाजता - निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या पेहरावाच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी परिधान केलेली साडी ही मधुबनी कलेल्या सन्मानार्थ तयार करण्यात आली असून, या निमित्तानं त्यांनी पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांच्या योगदानालाही देशासमोर आणलं आहे.
#UnionBudget2025 | Union Finance Minister Nirmala Sitharaman is wearing a saree as a tribute to Madhubani Art and the skill of Padma awardee Dulari Devi.
Dulari Devi is a 2021 Padma Shri awardee. When FM visited Madhubani for a credit outreach activity at Mithila Art Institute,… pic.twitter.com/Q9ur6abaNt
— ANI (@ANI) February 1, 2025
#WATCH | Delhi | Union Finance Minister Nirmala Sitharaman and MoS Finance Pankaj Chaudhary meet President Droupadi Murmu at the Rashtrapati Bhavan
Union Finance Minister Nirmala Sitharaman will present #UnionBudget2025, today at Lok Sabha pic.twitter.com/D8PYCoGf4K
— ANI (@ANI) February 1, 2025
#WATCH | Delhi | Union Finance Minister Nirmala Sitharaman and MoS Finance Pankaj Chaudhary arrive at the Rashtrapati Bhavan to meet President Droupadi Murmu ahead of tabling #UnionBudget2025 pic.twitter.com/zU16VQPTYQ
— ANI (@ANI) February 1, 2025
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदा 8 व्यांदा देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार असून, याच अर्थसंकल्पाच्या प्रती लोकसभेत दाखल झाल्या आहेत. त्या क्षणाची ही दृश्य...
#WATCH | Delhi | Copies of #UnionBudget2025 are brought to parliament as Union Finance minister Nirmala Sitharaman will today table her 8th Union Budget, for the fiscal year 2025-26, in Lok Sabha pic.twitter.com/AKWZQYTExW
— ANI (@ANI) February 1, 2025
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman leaves from the Ministry of Finance.
She will present and read out the #UnionBudget2025 at the Parliament through a tab, instead of the traditional 'bahi khata'. pic.twitter.com/89XblFTwmk
— ANI (@ANI) February 1, 2025
आरोग्य क्षेत्रासाठी दिल्या जाणा-या बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 91 हजार कोटी आरोग्य बजेटसाठी दिले होते. त्यात आता 10 टक्के वाढ होण्याची शक्यता असून, त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढवण्याची घोषणा होऊ शकते. याशिवाय काही वैद्यकीय उपकरणांवरील आयात शुल्कही कमी केलं जाणारेय.
केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या प्रतीसह राष्ट्रपतीभवनाकडे रवाना. अर्थसंकल्प राष्ट्रपतींकडे सुपूर्द करत पुढील कार्यवाहीसाठी मार्गस्थ होणार. याचसाठी निर्मला सीतारमण नॉर्थ ब्लॉककडून राष्ट्रपतीभवनाकडे रवाना.
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman leaves from her residence. She will present #UnionBudget2025 at the Parliament today. pic.twitter.com/kcf4aEZz0h
— ANI (@ANI) February 1, 2025
भारतात मोठ्या वर्गानं नोकरदार आणि पगारदार वर्ग असून, याच सामन्य वर्गाला केंद्रस्थानी ठेवत यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर प्रणालीमध्ये 10 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकार एक नवी करप्रणाली सुरू करणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
देशातील सर्वात मोठ्या बॅटरी तयार करणाऱ्या Exide Industries या कंपनीच्या शेअरना तज्ज्ञांनी पसंती दिली असून, पुढील एक ते तीन वर्षांसाठीच्या कालावधीत या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास याचा सकारात्मक फायदा मिळेल.
(शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असून कृपया नियम व अटीं वाचून तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय घ्या. )
देशाची अर्थव्यवस्था विविध स्तरांवर आव्हानांचा सामना करत असतानाच मोदी सरकार तिसऱ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. एकिकडे देशाचा विकास दर धीम्या गतीनं पुढे जात असतानाच यंदाच्या आर्थिक वर्षात ही आकडेवारी 6.4 टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच्या संसदीय कामकाजादरम्यान आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी आर्थिक सुधारणा राबवण्याची गरज असल्याचं मत मांडण्यात आलं.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.