Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

India Pakistan Attack LIVE Updates: नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी दिसले ड्रोन, वाचा नेमके कुठे?

Operation Sindoor India Pakistan War Breaking News LIVE Updates in Marathi: भारतीय लष्कराच्या तिन्ही तुकड्यांनी सीमाभागांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शेजारी राष्ट्राचे सर्व मनसुबे उधळून लावले आहेत.   

India Pakistan Attack LIVE Updates: नियंत्रण रेषेवर 26  ठिकाणी दिसले ड्रोन, वाचा नेमके कुठे?
LIVE Blog

भारत पाकिस्तान युद्ध  India Pakistan War Live Updates : भारतानं दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर अर्थात ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून देखील भारतावर हल्ला करण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न फसलाय. पाकिस्ताननं पंजाब, (Jammu Kashmir) जम्मू, राजस्थान,  गुजरातमधील अनेक शहर टार्गेट केली होती. मात्र, पाकिस्तानचा हल्ला भारतानं हवेत उडवून लावलाय. पाकिस्तानच्या मिसाइल्स तसंच ड्रोन भारतानं खाक केल्या आहेत. दरम्यान यानंतर भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला केलाय. भारतानं पाकिस्तानच्या 15 मोठ्या शहरांवर जोरदार हल्ला केलाय. भारतानं हल्ल्यात रावळपिंडीमधील लष्करी अधिका-यांची तळं देखील उद्धवस्त केली आहेत.. तसंच लाहोर, कराचीमधील एअर डिफेन्स सिस्टिम देखील भारतानं खाक  केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील अनेक शहरात आणीबाणी लागू करण्यात आलीय. भारताच्या S-400नं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. 

09 May 2025
09 May 2025 23:48 PM

India Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अमेरिकेचं मोठं विधान; व्हाईट हाऊसने म्हटलं की 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना...'

09 May 2025 23:27 PM

नियंत्रण रेषेवर 26  ठिकाणी दिसले ड्रोन 

उत्तरेकडील बारामुल्ला ते दक्षिणेकडील भूज पर्यंत, आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानशी असलेल्या नियंत्रण रेषेवर 26  ठिकाणी ड्रोन दिसले आहेत. यामध्ये नागरी आणि लष्करी लक्ष्यांना संभाव्य धोका निर्माण करणारे संशयित सशस्त्र ड्रोन समाविष्ट आहेत.

या ठिकाणी बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला यांचा समावेश आहे: संरक्षण सूत्र

09 May 2025 22:47 PM

IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर

09 May 2025 22:07 PM

IPL 2025 पुन्हा भारतात खेळवणार कि विदेशात? BCCI च्या अधिकाऱ्यांनी दिली मोठी माहिती

09 May 2025 22:00 PM

जम्मूकडे येणारे किमान 10 ड्रोन पाडण्यात आले

- पठाणकोटमध्ये सुमारे 30 स्फोटांचे आवाज ऐकू आले.
- जम्मूकडे येणारे किमान 10 ड्रोन पाडण्यात आले
- श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट
- जम्मू विभागातील स्रोतावर 100+ UAVs ने हल्ला केला.
- पंजाबच्या पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट दरम्यान भारताच्या हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानी ड्रोन रोखले
- उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी येथील नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाकिस्तानने जोरदार गोळीबार केला. भारतीय लष्कराने याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
- बाडमेरमधील उत्तरलाई येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले.
- पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ले केले जात आहेत.
- सकाळी 9 वाजता गुरुवारप्रमाणे पुन्हा ड्रोन हल्ले सुरू झाले. भारतीय सैन्याकडून ड्रोन पाडले जात आहेत.
- अमृतसर विमानतळावरील उड्डाणे 15  तारखेपर्यंत बंद
- फरीदकोटमध्ये मोठा स्फोट ऐकू आला, त्यानंतर शहरात इशारा देणारा सायरन वाजवण्यात आला
- सांबा येथे ड्रोन पाडण्यात आले.
- पठाणकोटमध्ये पाकिस्तानी ड्रोनही पाडण्यात आले.
- दक्षिण काश्मीरमध्ये ड्रोन हल्ला उधळला, अवंतीपोरा येथे ड्रोन हल्ला अयशस्वी
- पोखरण, रामदेवरा येथे ड्रोन हल्ले सुरूच. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ला उधळून लावला.
- पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले अयशस्वी, पोखरणमध्येही ड्रोन हल्ला अयशस्वी
- परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव देखील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले
- जैसलमेरमध्येही ड्रोन हल्ला अयशस्वी
- गुरुदासपूरमधील करतारपूर कॉरिडॉरजवळही स्फोट सुरू झाले, २ ड्रोन पाडण्यात आले.
- फिरोजपूरमधील एका निवासी भागात एका पाकिस्तानी ड्रोनने हल्ला केला आणि त्यात एक कुटुंब जखमी झाले. पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
- कच्छ आणि बनासकांठा सीमेजवळ 10-12 ड्रोन
- नलिया परिसरातच ड्रोनची हालचाल दिसून आली.
- कच्छच्या सर्व सीमावर्ती भागात ब्लॅकआउट लागू.

09 May 2025 21:54 PM

IMF कडून पाकिस्तानसाठी कर्ज कार्यक्रमाचा आढावा; भारताने चिंता व्यक्त केली 

* आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानसाठी विस्तारित निधी सुविधा (EFF) कर्ज कार्यक्रम ($1 अब्ज) आणि नवीन लवचिकता आणि शाश्वतता सुविधा (RSF) कर्ज कार्यक्रम ($1.3 अब्ज) चा आढावा घेतला.
* भारताने IMF च्या पाकिस्तानसाठीच्या कार्यक्रमांच्या कार्यक्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली, कारण पाकिस्तानचा आर्थिक वचनबद्धतेचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे.
* भारताने कर्ज निधीचा *राज्य प्रायोजित सीमापार दहशतवादासाठी वापर होऊ शकतो* अशी शक्यता मांडली.

09 May 2025 21:20 PM

पठाणकोटमध्ये एकामागोमाग एक 10 स्फोट

- उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी येथील नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाकिस्तानने जोरदार गोळीबार केला. भारतीय लष्कराने याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

- राजौरीमध्ये सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

- जम्मू शहरात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू येतात. पूंछ, मेंढर, मांजाकोट येथे आवाज येत आहेत. 

- एनएसए आणि रॉ प्रमुख पंतप्रधानांसोबत स्वतंत्रपणे बैठक घेत आहेत.

- कुपवाडा, क्रालपोरा, तंगदार, कर्नाह, उरी, हाजीपीर, लगामा, नौशेरा, पुंछ, राजौरी, सांबा, अखनूर येथे पाकिस्तानकडून झालेले प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. 

- पठाणकोटमध्ये एकामागोमाग एक 10 स्फोट झाले, मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले उधळले गेले
- गुरुदासपूरमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले सुरू, एकाच वेळी तीन स्फोट झाले

- जैसलमेरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला.

- जोधपूर शहरात ब्लॅकआउट करण्यात आले. संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला.

- पठाणकोटमध्ये सुमारे 30 स्फोटांचे आवाज ऐकू आले.

09 May 2025 20:59 PM

जम्मू, सांबा, पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले: संरक्षण सूत्र

- राजौरीमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
- जम्मू, सांबा, पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले: संरक्षण सूत्र
- खबरदारीचा उपाय म्हणून हरियाणातील अंबाला येथे पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला आहे.
- पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली आढावा बैठक संपली आहे. राजनाथ सिंह बैठकीतून निघून गेले.
- सीडीएस अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख डीके त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एपी सिंह पंतप्रधान निवासस्थानातून निघाले.

- उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर जोरदार तोफखाना गोळीबार सुरू आहे.
- नियंत्रण रेषेवरील हाजिरा, टेट्रिनॉट, अब्बासपूर आणि बट्टल सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.
- जोधपूरमध्ये तात्काळ ब्लॅकआउट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल यांनी आदेश जारी केला

09 May 2025 20:47 PM

नवीन अपडेट्स -

अमृतसरमध्ये लाइट बंद करण्यासाठी सायरन वाजण्यास सुरुवात
जम्मू विभागातील अखनूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले आहे आणि सायरन ऐकू येत आहेत.
जम्मू, सांबा, पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले

09 May 2025 20:42 PM

पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, फोटो दाखवत सोफिया कुरेशींनी पाकला उघड पाडलं!

09 May 2025 20:32 PM

उरीवर पाकिस्तानकडून ड्रोनहल्ला

 

- उरीमधील कामलकोट येथे पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला 

- जम्मूमध्ये सायरन आणि स्फोटाचा आवाज ऐकू आला. जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट

09 May 2025 20:23 PM

LOC कमलकोट सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार

- उरी परिसरातील सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
- पाकिस्तान सीमेजवळील गावांना लक्ष्य करत आहे
- स्थानिक लोकांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचे व्हिडिओ बनवले
- पाकिस्तान नागरिकांना लक्ष्य करत आहे

दरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं असून उरीनंतर आता तंगधार कुपवाडा येथे पाकिस्तानकडून पुन्हा जोरदार गोळीबार सुरू आहे. 

09 May 2025 20:22 PM

Fact Check : भारतावर केलेले सगळे हल्ले अपयशी; पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटे 

09 May 2025 20:15 PM

'भारताला टार्गेट करण्यासाठी पाकिस्तानकडून रात्री 300 ते 400...', कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा

 

09 May 2025 20:14 PM

भारताला जगाची साथ! पाकिस्तानचं गाऱ्हाणं ऐकण्यास अमेरिकेचा नकार, जेंडी वेंस म्हणाले 'आम्हाला काही देणं घेणं नाही...'

 

09 May 2025 20:13 PM

'अशी कोणतीच ताकद नाही जी पाकिस्तानला...', भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबर आझमचं खुलं आव्हान

09 May 2025 19:31 PM

Operation Sindoor बद्दल मोठी अपडेट! 24 विमानतळे तात्पुरते बंद, तर 'या' शहरात आज संध्याकाळी 7 वाजेनंतर दुकानं आणि रेस्टॉरंट्स बंद

09 May 2025 19:31 PM

पंतप्रधान मोदींची सशस्त्र दलांच्या माजी अधिकाऱ्यांसोबत बैठक

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशस्त्र दलांच्या माजी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
* चर्चेत सध्याच्या परिस्थितीवरील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
* या बैठकीला माजी हवाई दल प्रमुख, लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख आणि देशासाठी उल्लेखनीय सेवा बजावलेल्या इतर अनुभवी अधिकारी उपस्थित होते.

09 May 2025 18:51 PM

२४ विमानतळं तात्पुरती बंद 

सर्व नागरी विमान वाहतूक पुढील आदेशापर्यंत थांबवली आहेत. 24 विमानतळांवर NOTAM जारी करण्यात आलं असून, उड्डाणे बंद करणयात आली आहे. प्रवाशांनी अधिकृत सूचनांची प्रतिक्षा करावी.

09 May 2025 17:50 PM

'पाकिस्तानी हल्ल्यात तुर्कीची शस्त्रे वापरली गेली', कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती

परराष्ट्र मंत्रालयाने सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल नवीन माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, तसंच घुसखोरीचा प्रयत्न झाला. तंगधार, उरी आणि उधारपूर येथे जोरदार गोळीबार झाला. पाकिस्तानी गोळीबारामुळे नुकसान झाले आहे. तो फोटो दाखवत तो म्हणाला की भारतीय हवाई दलाने खूप संयम दाखवला आहे.

09 May 2025 16:48 PM

India Pakistan War : ब्लॅकआऊटपासून आपत्कालीन फंडपर्यंत; आढावा बैठकीत CM फडणवीसांकडून 12 स्पष्ट आदेश 

09 May 2025 16:47 PM

पाकिस्तानला बलुचिस्तानकडून तगडं आव्हान... 

मागील काही दिवसांचा आढावा घेतल्यास, बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दल, पायाभूत सुविधा आणि संसाधन वाहतूक वाहनांना लक्ष्य करून समन्वित हल्ल्यांची मालिका पाहायला मिळाली. ज्यामध्ये तीन "स्वातंत्र्य समर्थक" बलुच सशस्त्र गटांनी अनेक घटनांची जबाबदारी स्वीकारली. बीएलएने बलुचिस्तानवर ताबा मिळवल्याचा दावा केला. बीएलएने १४ पोस्ट ताब्यात घेतल्याचा दावा सूत्रांनी केला, तर बीएलएने अनेक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.   

09 May 2025 16:26 PM
09 May 2025 15:17 PM

उदयपुरमध्ये 11 संशयित ताब्यात

उदयपुरमध्ये 11 संशयित ताब्यात. गोगंदा भागातून केली कारवाई. आता या 11 जणांकडे असणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी सुरू. 

 

09 May 2025 14:44 PM

मुंबईचा जवान शहीद 

घाटकोपर(पूर्व) वार्ड क्रं 133 मधील कामराज नगरचे रहिवाशी श्रीराम नाईक यांचा ज्येष्ठ मुलगा भारतीय जवान मुरली नाईक यांना 9 मे 2025 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तान युद्धात रगती प्राप्त झाली.

09 May 2025 14:33 PM

भारताकडून गॅजेट अधिसूचना काढून सेनाध्यक्षांना अधिकारप्रदान

भारताकडून गॅजेट अधिसूचना काढून सेनाध्यक्षांना अधिकारप्रदान. सैन्यसेवेसंदर्भात 9 फेब्रुवारी 2028 पर्यंत सेनाध्यक्षांकडे सर्वाधिकार. टेरिटोरियल आर्मीतील अधिकाऱ्यांना बोलवण्याचे सेनाध्यक्षांना अधिकार. देशभरातील सर्व सैन्यसेवेतील अधिकारीय, सैनिकांच्या ड्युटी लावण्याचे सेनाध्यक्षांना अधिकार. 

09 May 2025 13:30 PM

भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करणार- आसिफ

भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करणार. काल रात्रीसुद्धा आम्ही तेच केलं असं पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले. पाकिस्तानी जनतेनं निश्चिंत रहावं असा फुकाचा विश्वासही त्यांनी देऊ केला. 

 

09 May 2025 13:17 PM

पाकिस्तानच्या तोफगोळ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये इमारतींचं नुकसान.... वृत्तसंस्थेकडून व्हिडीओ जारी 

09 May 2025 13:15 PM

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातून अधिकाऱ्यांनी काढला पळ 

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण. मोठ्या अधिकाऱ्यांसह मुख्य नेते ते व्हीव्हीआयपी व्यक्ती यांनीही काढला पळ. आताच्या क्षणाची मोठी माहिती समोर. 

 

09 May 2025 12:55 PM

 IPL 2025 रद्द होणार? भारत-पाकिस्तान वाढत्या तणावामुळे BCCI ने घेतला 'हा' मोठा निर्णय 

 

 

09 May 2025 12:49 PM

भारत- पाक संघर्षादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निवेदन जारी

'पहलगामच्या भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेविरुद्ध "ऑपरेशन सिंदूर" ही निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन. हिंदू यात्रेकरूंच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढले आहे.

आमचा असाही विश्वास आहे की पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल आहे. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश तन, मन आणि धनाने सरकार आणि सशस्त्र दलांसोबत उभा आहे. भारतीय सीमेवरील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.'

09 May 2025 12:41 PM
09 May 2025 12:34 PM

वित्तीय संस्था, सायबर सुरक्षा ते आरोग्यसुविधांच्या पुरवठ्याबाबत आढावा बैठका 

केंद्रीय अर्थमंत्री आज संध्याकाळी बँका आणि वित्तीय संस्थांच्या सायबरसुरक्षा तयारीबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान करतील. तर, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी एक बैठक बोलावली आहे. औषधे आणि इतर आरोग्याशी संबंधित वस्तूंच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आरोग्य सेवांच्या उपलब्धतेबद्दल चर्चा करू. यानंतर, फार्मा अधिकाऱ्यांनाही ते भेटणार असल्याची माहिची समोर. 

09 May 2025 12:30 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तातडीची बैठक 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तातडीची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवारही तातडीनं साताऱ्याहून बैठकीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना. पाकिस्ताननं कटकारस्थानं रचल्यास राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणत्याही उणिवा राहणार नाहीत याचा आढावा घेतला जाणार. 

09 May 2025 12:16 PM

पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; दगडूशेठ गणपती मंदिरातही...

 

09 May 2025 12:12 PM

भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका! फक्त 10 सेकंदात 300000000000 रुपयांचा चुराडा...

 

09 May 2025 12:12 PM

'ऑपरेशन सिंदूर'वर चित्रपट बनवण्यासाठी स्पर्धा; नावाच्या पेटंटसाठी 15 निर्मात्यांमध्ये वाद

09 May 2025 12:08 PM

केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची उत्तस्तरिय बैठक

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उच्चस्तरिय अधिकाऱ्यांमध्ये तासाभरापासून महत्त्वाची बैठक. देशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचं काम सुरू. संरक्षण मंत्रालयाच उत्तस्तरिय बैठक सुरू. 

 

09 May 2025 11:59 AM

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अनेक राष्ट्रांचा पाठींबा 

भारताच्या या दृष्टिकोनाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून जोरदार पाठिंबा मिळाला आहे. युनायटेड किंग्डमने सर्वप्रथम पाठिंबा दर्शविला. परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी म्हणाले की भारताला संताप येण्याचे सर्व कारण आहे आणि माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी असे प्रतिपादन केले की कोणत्याही देशाने सीमापार दहशतवाद सहन करू नये. रशियाने दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याचे आवाहन करताना स्पष्ट केले की ते सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करते आणि लष्करी वाढत्या घटनेबद्दल त्यांना तीव्र चिंता आहे. इस्रायल देखील भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. दहशतवाद्यांना कोणतेही आश्रयस्थान नाही आणि त्यांनी भारताच्या स्वतःच्या बचावाच्या अधिकाराचे समर्थन केले.

 

09 May 2025 11:23 AM

बीएसएफनं दहशतवाद्यांचा खात्मा कसा केला? व्हिडीओ समोर 

गुरुवारी 8 मे रोजी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सांबा सेक्टरमधून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतानं अपयशी ठरवत 7 दहशतवाद्यांना जागच्या जागी कंठस्नान घातलं. तर पाकिस्तानच्या लष्करी चौकीचंही यात मोठं नुकसान झालं. घटनेचा व्हिडीओ समोर.... 

 

09 May 2025 11:12 AM

पठाणकोटमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक अडकले... 

जम्मू-काश्मीर सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी ब्लॅक अलर्ट जारी केल्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सुमारे 40 महिला, पुरुष व लहान मुले पठाणकोटमध्ये अडकले आहेत..या गटात भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर यांच्या सह चाळीस जणांचा समावेश आहे. हे सर्वजण वैष्णवदेवीच्या दर्शनाला गेले होते. सध्या सर्वजण सुरक्षित असून जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क सुरू आहे

 

09 May 2025 11:05 AM

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, 'या' ट्विटमुळे आला अडचणीत; नेटिझन्सने शिकवला धडा

 

 

09 May 2025 11:00 AM

पंजाबमध्ये चिनी बनावटीचं मिसाईल सापडलं 

पंजाबमध्ये चिनी बनावटीचं मिसाईल सापडल्यानं खळबळ. पाकिस्तानकडे चिनी हत्यारं असल्याचा सर्वात मोठा पुरावा. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या अपयशी हल्ल्याक केला गेला चिनी शस्त्रांचा वापर. 

 

09 May 2025 10:54 AM
09 May 2025 10:31 AM

मुंबईत ड्रोनसदृश्य वस्तू दिसल्यानं खळबळ; पोलीस म्हणतात.... 

साकीनाका परिसरातील नागरिकाला ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्याचे त्याने पोलिसांना कळवले मात्र पोलिसांनी शोध घेतला असता त्या ठिकाणी काहीच सापडले नाही , साकिनाका विभाग विमानतळ परिसर असल्यामुळे अति संवेदनशील विभाग म्हणून साकीनाकाकडे पाहिले जात त्यामुळे नेहमीच सतर्क असलेले पोलीस आणि सीआयएसएफ यांनी ही शक्यता फेटाळून लावलेली आहे. तरीसुद्धा मुंबई पोलीस या प्रकरणाची  अधिक चौकशी करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. 

09 May 2025 10:01 AM

26/11 प्रमाणे समुद्रातून घुसखोरीचा धोका; मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची झाली महत्वाची बैठक. नौदल ठिकाणं, संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या सूचना. लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार. पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती. 26/11 प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी. 

09 May 2025 09:59 AM

LSG vs RCB: आज IPL चा सामना होणार की नाही? अरुण धुमाळ यांनी चाहत्यांना दिली माहिती

 

 

09 May 2025 09:38 AM

चंदीगढमध्ये पुन्हा वाजले सायरन 

चंदीगढमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजले असून, नागरिकांना घरात राहण्याचा इशारा. ड्रोन हल्ल्याची शक्यता असस्यानं भारतीय सैन्य सज्ज. 

 

09 May 2025 09:36 AM

देशातील 28 विमानतळं प्रवासी वाहतुकीसाठी बंद

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील 28 विमानतळं प्रवासी वाहतुकीसाठी बंद. लाल किल्ला, इंडिया गेट परिसरातील सुरक्षेत वाढ. राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवली. 

 

09 May 2025 09:20 AM

अखंड भारताची भारतीय इमामांकडून मागणी

09 May 2025 09:07 AM

शहबाज शरीफ यांची सोशल मीडिया पोस्ट 

fallbacks

 

09 May 2025 09:05 AM

शहबाज शरीफ यांची सोशल मीडिया पोस्ट, मात्र...

हल्ल्यानंतर शाहबाज शरीफ यांची सोशल मीडिया पोस्ट. हल्लाच्या 24 तासांनंतर आली जाग, मात्र पाकिस्तानी जनतेला कोणताही संदेश. हल्ल्याचा कोणताही उल्लेख नाही. 

 

09 May 2025 09:01 AM

India Pakistan War : 14 सेकंद, अचूक नेम आणि स्फोट! भारतीय सैन्यानं जारी केला ड्रोन हल्ल्याचा व्हिडीओ 

09 May 2025 08:57 AM

फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि व्हॉट्सअॅप सावधगिरी बाळगा! 

भारत-पाकिस्तान तणावामुळे युद्ध लांबत चालले आहे असे दिसते. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर काहीही चुकीचे पोस्ट केले जाऊ नये हे देखील महत्त्वाचे बनते. पीआयबी फॅक्ट चेक - प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत फॅक्ट चेकिंग सोशल मीडिया हँडल एक्सने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, पाकिस्तान प्रायोजित प्रचार असलेल्या बनावट सोशल मीडिया पोस्टविरुद्ध इशारा देण्यात आला आहे.

 

09 May 2025 08:41 AM

भारताने पाकिस्तानचे 50 ड्रोन हल्ले उधळून लावले. 

भारताने पाकिस्तानचे 50 ड्रोन हल्ले उधळून लावले. पाकिस्तानने उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नरगोटा येथे मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने ते सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले.

 

09 May 2025 08:38 AM

युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर

युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे आवाहन. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय संस्थांना आवाहन. स्थानिक यंत्रणांसोबत समन्वय ठेवा, औषधे, खाटा व अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा, अधिकाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा साठा करा अशा सूचनांसह नागरिकांनीही मदत करण्याचे फेडरेशनने केले आवाहन. 

09 May 2025 08:36 AM

पुण्याहून 13 विमान उड्डाणं रद्द 

पुण्याहून 13 विमान उड्डाणं रद्द. पाकच्या हल्ल्यानंतर  पुण्याहून इतर शहरात जाणारी प्रवासी विमान सेवा रद्द. अमृतसर, हैदराबाद, कोची, जोधपूर, चंदिगड, राजकोट, जयपूर, सुरतला जाणाऱ्या फ्लाईट रद्द. पाक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनही अलर्ट मोडवर.

09 May 2025 08:35 AM

पाकिस्तानात हाहाकार 

पाकिस्तान विमानतळावर हाहाकार; 24 तासांपासून विमानतळावरच अडकले प्रवासी. लाहोर, कराचीमधील विमानं हल्ल्यांमुळे प्रभावित. इस्लामाबाद विमानतळही प्रभावित. 

 

09 May 2025 08:23 AM

कधी संपणार ऑपरेशन सिंदूर? 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची परतफेड करण्यासाठी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं. मात्र ही कारवाई आणि मोहिम दहशतवादाचा कणा मोडेपर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. किंबहुना पाकिस्तानच्या हस्तक्षेपामुळं ही कारवाई अधिक काळही टीकू शकते असं सांगण्यात येत आहे. 

 

09 May 2025 08:22 AM

पीओकेतील आणखी एक दहशतवादी तळ उध्वस्त

भारताच्या ड्रोन हल्ल्यात पीओकेतील आणखी एक दहशतवादी तळ उध्वस्त. पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी मोठं पाऊल. 

 

09 May 2025 08:21 AM
09 May 2025 08:20 AM

भारत-पाकिस्तान संघर्षानंतर बॉलिवूडही सावध; रात्रीची झोप उडाली तरी... सूचक पोस्ट करत वेधलं लक्ष

09 May 2025 07:29 AM

भारतीय वायू सुरक्षा यंत्रणेकडून काऊंटर ड्रोन ऑपरेशन

गुरुवारी रात्री, जेव्हा पाकिस्तानने नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) वर विविध ठिकाणी झुंड ड्रोन पाठवण्याचे अयशस्वी प्रयत्न केले, तेव्हा उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सनी मोठ्या प्रमाणात काउंटर-ड्रोन ऑपरेशन केले. या कारवाईत L-70 तोफा, Zu-23mm, Schilka प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-UAS उपकरणांचा व्यापक वापर करण्यात आला, ज्यामुळे हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी सैन्याची मजबूत क्षमता दिसून आली: सूत्र

09 May 2025 07:11 AM

पाकिस्तानवर बीएलएचे एकामागुन एक हल्ले; बेचिराख पाकच कंबरडं मोडलं

बलूच सैन्यानं पाकिस्तानवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यानं पाकिस्तानची पुरती कोंडी. एकिकडून भारत आणि दुसरीक़डून बलूच सैन्य... बेचिराख पाकच कंबरडं मोडलं. 

09 May 2025 07:09 AM

पाकिस्तानने डागलेली सर्व क्षेपणास्त्रं नष्ट 

एका मोठ्या यशात, भारतीय सशस्त्र दलांनी आज रात्री जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील जम्मू, उधमपूर आणि पठाणकोट येथील लष्करी तळांना लक्ष्य करून पाकिस्तानने डागलेली सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यशस्वीरित्या नष्ट केले. S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (SAM) आणि एकात्मिक काउंटर अनमॅन्ड (ICM) विमान प्रणालीचा वापर करून हे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करण्यात आले.

 

09 May 2025 06:49 AM

अरबी समुद्रामध्ये नौदलाची रंगीत तालीम

अरबी समुद्रामध्ये नौदलाची रंगीत तालीम. भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर आणखी एक प्रहार. समुद्रात गर्जना करतंय भारतीय नौदल. 

09 May 2025 06:45 AM

सकाळी 10 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद 

सकाळी 10 वाजता होणार भारतीय लष्करासह परराष्ट्र विभागाची संयुक्त पत्रकार परिषद. सरकारी माहितीकडे साऱ्या देशाचं लक्ष... 

 

09 May 2025 06:39 AM

भारताची शांत सकाळ

तणावपूर्ण रात्रीनंतर उरी आणि जम्मू काश्मीरमधील बहुतांश भागांमध्ये शांत सकाळ. सैन्यदलाच्या अभेद्य कवचामुळं देशवासीयांमध्ये भीती नाही मात्र सावधगिरी कायम....
 

09 May 2025 06:33 AM

ब्लॅकआऊटनंतर वीजपुरवठा पूर्ववत... 

ब्लॅकआऊटनंतर अनेक शहरांमध्ये पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. बारामुला, अमृतसर, जैसलमेर, तरनतारन या भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत. 

 

09 May 2025 06:31 AM

पाकिस्तानच्या 20 शहरांमध्ये आणीबाणी 

भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड विनाश, पाकिस्तानच्या 20 शहरांमध्ये आणीबाणी जाहीर. भारत-पाकिस्तान युद्ध: पाकिस्तानची बेलआउट योजना पुनरावलोकनासाठी येत असल्याने आज वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या आयएमएफ बोर्ड बैठकीकडे सर्वांचे लक्ष. भारत उच्च-स्तरीय आर्थिक कूटनीतिमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

09 May 2025 06:24 AM

जम्मू काश्मीरमधून मोठी अपडेट 

09 May 2025 06:22 AM

कराचीत गुरुवारी रात्री 15 स्फोट 

पाकिस्तानच्या मोठ्या शहरहांमध्ये भारताचा हल्ला. कराचीत रात्रभर 15 स्फोट. पाकिस्तानच्या नरोवालमध्ये आणीबाणी जाहीर. 

 

09 May 2025 06:05 AM

 पाकिस्तानी नागरिकांसाठी पंतप्रधानांचा संदेश 

शहबाज शरिफ यांनी पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिडीओच्या माध्यमातून एक संदेश जारी केला आहे. 

 

09 May 2025 06:04 AM

अख्नूर सेक्टरमध्ये भारतानं पाकिस्तानी ड्रोन पाडला 

भारतीय लष्करानं अख्नूर सेक्टरमध्ये भारतानं पाकिस्तानी ड्रोन पाडला. आताच्या क्षणाची मोठी बातमी. सीभागात तणाव. 

09 May 2025 06:01 AM

पाकिस्तानच्या 56 ड्रोनच्या चिंधड्या 

भारताकडून पाकिस्तानचे 56 ड्रोन आतापर्यंत पाडण्यात आले आहेत. पाकिस्तानची 2 जेट फायटर विमानं पाडली. पाकिस्तानचं 1 लढाऊ विमानंही पाडलं

 

09 May 2025 06:01 AM

पाकिस्तानच्या मोठ्या शहरांवर भारताचा हल्ला

लाहोर, कराची, रावळपिंडीत भारताकडून लागोपाठ हल्ले. भारताच्या हल्ल्यात पाकची लष्करी तळं उद्ध्वस्त. पाकव्याप्त काश्मिरमध्येही भारताकडून मोठे हल्ले. पाकिस्तानच्या अनेक मोठ्या शहरांवर भारताचा हल्ला. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा जबरदस्त हल्ला. इस्लामाबाद कराचीसह 15 शहरांवर हल्ला. 

09 May 2025 05:59 AM

पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट 

सियालकोटमध्ये गोळीबाराला सुरुवात झाली होती. आता भारतानं हल्ला करत सियालकोट येथील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली आहे. 

 

09 May 2025 05:59 AM

तीन वैमानिकांना भारतानं युद्धबंदी केलं

पाकिस्ताननं केलेला हल्ला भारतानं परतावून लावलाय.. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं जोदरार प्रत्युत्तर दिलंय. भारतानं पाकिस्तानचे 6 लढाऊ विमानं पाडलेत. तर पाकिस्तानच्या तीन वैमानिकांना भारतानं युद्धबंदी केलंय.राजस्थान आणि काश्मीरमधून पाकिस्तानच्या सैनिकाला भारतीय सैनिकांनी युद्धबंदी केलंय.

 

09 May 2025 05:58 AM

आयएनएस विक्रांतकडून इतिहासाची पुनरावृत्ती

भारताची युद्धनौका आयएनएस विक्रांतकडून इतिहासाची पुनरावृत्ती. 1971 नंतर दुस-यांदा कराची बंदरावर हल्ला. 54 वर्षांत कराचीवर विक्रांतचा दुस-यांदा हल्ला. नव्या आयएनएस विक्रांतचा पाकविरोधात जलवा

 

Read More