India Pakistan War Live Updates in Marathi: पाकिस्तानने जम्मू आणि पठाणकोटमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. पण, भारतीय सैन्याने पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने 8 पाकिस्तानी क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचे वृत्त आहे.
भारताने पाकिस्तानच्या 15 हून अधिक शहरांवर हल्ला केला आहे. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. पंतप्रधान मोदी प्रत्येक क्षणाची माहिती घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज सकाळपासून,जम्मू शहरात पुन्हा एकदा लष्करी हालचाली सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे. अनेक मोठे स्फोट आणि शहरात अचानक ब्लॅकआउट झाल्याचे वृत्त रहिवाशांनी दिले आहे. हवाई हल्ल्याचे सायरन सुरू करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी जनतेला घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारत - पाकिस्तान युद्धामध्ये बीएलएने बलुचिस्तानवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बीएलएने 14 पोस्ट ताब्यात घेतल्याचा दावा केल्याचा सूत्रांनी सांगितलं आहे. बीएलएने अनेक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे, अशा दावा त्यांनी केलाय.
आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. भारत - पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक बोलवली आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे.
बलुचिस्तानचा मोठा भाग गमावून पाकिस्तानला भारतावर हल्ला करण्याच्या अयशस्वी प्रयत्नांची किंमत चुकवावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसदृश परिस्थितीचा फायदा घेत, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करून बलुचिस्तान प्रांताचा एक तृतीयांश भाग ताब्यात घेतला आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई केली आणि हे सर्व ड्रोन अडवून ते पाडण्यात यश आले. पाकिस्तानने भारतातील अनेक संवेदनशील भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने हल्ला सुरू केला. असे सांगितले जात आहे की पाकिस्तानची अनेक मोठी शहरे भारताच्या हल्ल्याच्या कक्षेत आहेत. भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भारत - पाकिस्तानमधील युद्ध सुरु असताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्होअन्स यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही युद्धाच्या मध्यभागी सहभागी होणार नाहीत.
आताची सर्वात मोठी बातमी बॉर्डरवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीएसएफच्या हल्ल्यात 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 10 ते 12 दहशवाद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असताना बीएसएफच्या जवानी तो हाणून पाडला.
आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. जम्मूमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजले आहेत. हल्ल्याच्या भीतीने जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले आहेत. तर पाकिस्तानच्या बलुच आर्मीचा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील रावलकोटमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले. सेक्टरमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.
राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि संपूर्ण परिसर काळोखात बुडाला आहे. प्रशासनाने याबाबत सूचना जारी केल्या आहेत. लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारताच्या प्रत्युत्तरानंतर कराची बंदरात 8 ते 12 स्फोट झाले, त्यानंतर तेथे ब्लॅकआउट करण्यात आले आणि मोबाईल सिग्नल देखील खंडित झाला.
बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर अनेक हल्ले झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाला बंदूकधाऱ्यांनी लक्ष्य केले. गोळीबार झाला आणि त्यानंतर अनेक स्फोट झाले.
India Pakistan War LIVE : भारतीय वाहतूक संघटनेचा मोठा निर्णय...7 लाख ट्रक तयार आहेत, सरकार त्यांचा वापर माल किंवा सैनिकांची वाहतूक करण्यासाठी कुठेही आणि कोणत्याही मार्गाने करू शकते.
जमीनीनंतर आता पाण्यातून हल्ला, INS विक्रांतकडून पाकिस्तानच्या विध्वसाला सुरुवात; वैशिष्ट्य ऐकून भरेल धडकी!#INSVikranthttps://t.co/0xZ967tfce
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
#WATCH | A complete blackout has been enforced in Udhampur, Jammu and Kashmir pic.twitter.com/60imYT8NxD
— ANI (@ANI) May 8, 2025
India Pakistan War LIVE : मोठी बातमी! पाकिस्तानच्या प्रमुख ठिकाणांवर भारताने हल्ला केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ बंकरमध्ये लपले आहेत.
पश्चिम नौदल कमांड सक्रिय आहे. कराचीजवळ काही कारवाई करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांत आणि कोलकाता वर्गातील विध्वंसक युद्धनौका कृतीत. अधिकाऱ्याने सांगितले की केंद्रीय प्रणालीकडून अधिकृत माहिती शेअर केली जाईल, सध्या ऑपरेशन सुरू आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्याच्या अयशस्वी प्रयत्नांमुळे भारतातील 27 विमानतळ बंद करण्यात आले आहेत. यामध्ये चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना आणि कुल्लू यांचा समावेश आहे.
भारताबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या ट्विटर (एक्स) अकाउंट्सवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने आठ हजारांहून अधिक ट्विटर अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
India Pakistan War LIVE : भारताच्या जलद हल्ल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आहे . अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते.
भारताच्या हल्ल्यानंतर पेशावरमध्ये अनेक ठिकाणी आग लागली. शहबाद शरीफच्या घराजवळ हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील मोठे अधिकारी शहरातून पळून जाण्याचा तयारीत आहे.
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड विनाश झाला आहे. पाकिस्तानातील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर १०० क्षेपणास्त्रे डागली. त्याचवेळी भारताने एका पाकिस्तानी पायलटला ताब्यात घेतले आहे.
भारतीय लष्कर आणि हवाई दलानंतर आता भारतीय नौदलानेही थेट पाकिस्तानवर हल्ला केला आहे. आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर हल्ला केला. अशाप्रकारे, भारताच्या तिन्ही सैन्यांनी पाकिस्तानविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्याच वेळी, भारताने पाकिस्तानकडून दोन पायल पकडल्या आहेत.
India Pakistan War LIVE : मोठी बातमी! पाकिस्तानचे 2 पायलट्स पकडल्या गेले आहेत.
Jammu Airport Attack LIVE: मोठी बातमी! लोहार शहर स्फोटांनी हादरलं. पाकिस्तानची एअर फोर्स डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानच्या कराचीमध्ये लागोपाठ भारताचे हल्ले करण्यात आले आहेत. लाहोरवर ड्रोन हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आग लागली आहे.
Jammu Airport Attack Live Updates: आताची मोठी बातमी! पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादनंतर कराचीवर भारताने मिसाइल हल्ला केला आहे. बहावलपूरमध्येही भारताने हल्ला केला आहे.
Jammu Airport Attack LIVE: जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'जम्मूमधून खूप त्रासदायक बातम्या येत आहेत, जिथे काही भागांना लक्ष्य करून हवाई हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. जम्मूच्या लोकांसोबत, विशेषतः सीमेवर राहणाऱ्या लोकांसोबत, जे पुन्हा एकदा संघर्षाच्या भयानक अनिश्चिततेत अडकले आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. पीडीपी प्रमुख पुढे म्हणाले, 'या महत्त्वाच्या क्षणी, मी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शक्तीसाठी प्रार्थना करतो.' मी सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन करतो. खूप लोक आधीच आपले प्राण गमावले आहेत, शांतता आणखी दूर जाऊ देता कामा नये.
Jammu Airport Attack LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अजित डोवाल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरु आहे.
Jammu Airport Attack Live Updates : अमेरिकेकडून पाकिस्तानला माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. भारताच्या दहशतवाद्यांबरोबरच्या लढाईत अमेरिकासोबत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
Jammu Airport Attack Live Updates: URI सेक्टरमध्ये पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. पाकव्याप्त काश्मीर हाजीपीर सेक्टरमधून जोरदार गोळीबार करण्यात येत आहे. लेहमध्येही पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला आहे.
Jammu Airport Attack Live Updates: भारताकडून पाकिस्तानचे 56 ड्रोन पाडले, भारतीय सैनिकांची जोरदार कामगिरी
Jammu Airport Attack Live Updates: पाकिस्तानच्या हल्ला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भारताकडून पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मशाला स्टेडियमवर ब्लॅकआऊट! आयपीएलचा DC VS PBKS मॅच थांबवली
https://t.co/goOjyKq9hT#dharmashalastadium #DCvsPBKS #ipl2025 #marathinews— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
भारतीय एसएएमकडून २ जेएफ-१७ विमाने गमावल्याची पाकिस्तानने पुष्टी
BREAKING NEWS
Pakistan CONFIRMS loss of 2 JF-17s to Indian SAMs.
~ 1 F-16 also SHOT DOWN
Indian Armed Forces in action #Jammu #Jaisalmer pic.twitter.com/zmJPRzXBls
— Richard Kettleborough (@RichKettle07) May 8, 2025
Jammu Airport Attack Live Updates: आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.सतवारी,सांबात पाकिस्तानची 8 मिसाइल भारताकडून खाक
Jammu Airport Attack Live Updates: आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू प्रदेशातील अनेक ठिकाणी जोरदार गोळीबार सुरू आहे. पूंछ, राजौरी, अखनूर या ठिकाणी जोरदार गोळीबार सुरु आहे.
Jammu Airport Attack Live Updates: पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारताच्या S400 संरक्षण प्रणालीने त्यांचे नापाक हेतू हाणून पाडले. भारताने पाकिस्तानचे 1 एफ-16 आणि 2 जेएफ-17 लढाऊ विमाने तसेच 8 क्षेपणास्त्रे आणि 16 ड्रोन नष्ट केल्याचे वृत्त आहे.
Jammu Airport Attack Live Updates: गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमधील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त, पाकिस्तानने राजस्थानमधील पठाणकोट आणि जैसलमेरमध्येही आपल्या नापाक कारवाया करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पाकिस्तानच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने 3 लढाऊ विमाने पाडली आहेत. यामध्ये 1 एफ-16 आणि दोन जेएफ-17 विमानांचा समावेश आहे.
Jammu Airport Attack Live Updates: गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक भागात वीज खंडित झाली. यासोबतच सायरनही वाजू लागले. या काळात प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हे उल्लेखनीय आहे की भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, गुरुवारी सकाळी भारताने पाकिस्तानकडून येणारे अनेक रॉकेट नष्ट केले. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले. लष्करी अधिकारी कर्नल कुरेशी आणि हवाई दलाचे विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानने ७-८ मे च्या रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारताच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यात अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड आणि भूज यांचा समावेश आहे. तथापि, भारताच्या एकात्मिक काउंटर-यूएएस ग्रिड आणि मजबूत हवाई संरक्षण प्रणालींनी हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले.
Jammu Airport Attack Live Updates: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे 8 क्षेपणास्त्रे भारतीय हवाई संरक्षण युनिट्सनी सर्व हाणून पाडले आहेत. जम्मूवरील दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात.
A social media post falsely claims that the Indian military used Ambala Airbase to attack #Amritsar and its own citizens.
This claim is completely baseless and part of a concerted misinformation campaign.
Read more about #Pakistan attack on Amritsar… pic.twitter.com/C2NnXPjkgF
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2025
Jammu-kashmir Blackout |जम्मूमध्ये ब्लॅकआऊट; जम्मूमध्ये पाकिस्तानी ड्रोन, भारतीय यंत्रणा हायअलर्टवर#jammukashmir #indiapakistanwar #indiapakistanwar #oprationsindoor #zee24taas #pakistan pic.twitter.com/61ZlULvAsB
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
Jammu Airport Attack Live Updates: पाकिस्तानने जम्मूमधील हवाई तळावर रॉकेट डागले, परंतु भारताने हा हल्ला उधळून लावला. भारताच्या एस-400 ने 8 पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडली आहेत. एवढेच नाही तर भारताने पाकिस्तानचे एफ-16 जेटही पाडले आहे. तथापि, पाकिस्तानने सांबा येथे जोरदार गोळीबार केला आहे. पाकिस्तानी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूतील आरएस पुरा भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे, येथे सतत सायरन वाजत आहेत. सध्या जम्मू शहरात मोबाईल नेटवर्कही काम करत नाहीत. सतवारी कॅम्पवर हल्ला झाल्याची बातमी आहे. दुसरीकडे, कुपवाडामध्येही जोरदार गोळीबार झाला आहे. तंगधारमध्येही मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचा मारा झाला आहे. त्याच वेळी, पूंछ आणि राजौरीमध्येही जोरदार गोळीबार सुरू आहे.
Jammu Airport Attack Live Updates: जम्मूमधील विमानतळावर पाकिस्तानने हल्ला केल्याची ताजी माहिती समोर आली आहे. जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. 8 - 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले आहेत. भारतीय सैन्याने त्यांचे हल्ले हाणून पाडले आहेत. जम्मूमध्ये सायलनचा आवाज ऐकू येत आहे.
आताची सर्वात मोठी बातमी! जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला, 8 - 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज #IndiaPakistanWar #IndianArmy https://t.co/phQOu03KUW
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 8, 2025
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.