Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

Karnataka Election 2023 Live Updates : कर्नाटकात दुपारी 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान

Karnataka Election 2023 Live Updates : कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शेवटपर्यंत सत्ताधारी भाजपच्या बाजूने प्रचार केला. त्याचबरोबर नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, डीके शिवकुमार यांनी काँग्रेसचा आणि कुमारस्वामी यांनी जेडीएसनेही निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली.

Karnataka Election 2023 Live Updates : कर्नाटकात दुपारी 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान
LIVE Blog

Karnataka Assembly Election 2023 Updates : कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु होणार असून, ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. निवडणुकीनंतर 13 मे रोजी मतमोजणी होणार असून, त्यानंतर कर्नाटकात कोणाचे सरकार बनणार आहे, हे कळेल. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शेवटपर्यंत सत्ताधारी भाजपच्या बाजूने प्रचार केला. त्याचबरोबर काँग्रेस आणि जेडीएसनेही निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली.

10 May 2023
10 May 2023 15:50 PM

Karnataka Assembly Election 2023 Updates : कर्नाटकचे मंत्री आणि भाजप नेते नारायण गौडा यांनी त्यांच्या कुटुंबासह मंड्यातील मतदान केंद्रावर मतदान केले.

10 May 2023 14:39 PM

एचडी देवेगौडा यांनी केले मतदान 

Karnataka Election 2023 Live Updates : माजी पंतप्रधान आणि JDS प्रमुख एच.डी. देवेगौडा यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुसाठी होलेनारसीपुरा येथे मतदान केले. ते म्हणाले, पूर्वी हे एक छोटेसे गाव होते, जे आता विकसित शहर झाले आहे. चांगला विकास होत आहे. आरोग्य, शिक्षणाच्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, याचे श्रेय आमदार एच.डी. रवन्ना यांच्याकडे जाते.

10 May 2023 13:56 PM

विक्रमी फरकाने जिंकणार - बोम्मई 
Karnataka Election 2023 Live Updates : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी राज्यात भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत परतण्याचा विश्वास व्यक्त केला. हावेरी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत मतदान केल्यानंतर बोम्मई म्हणाले, विक्रमी फरकाने विजयी होतील. बोम्मई सलग चौथ्यांदा शिगगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  

10 May 2023 13:54 PM

कर्नाटकात दुपारी 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान 
Karnataka Election 2023 Live Updates :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान झाले आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी बुधवारी आरोप केला की, सत्ताधारी भाजपला ‘मनी पॉवर’च्या माध्यमातून विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत कारण त्यांच्याकडे ‘लोकांना दाखवण्यासाठी कोणतेही विकासकाम नाही’.

10 May 2023 12:50 PM

कर्नाटकात 20.99 टक्के मतदान
Karnataka Election 2023 Live Updates :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 20.99 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

10 May 2023 11:59 AM

भाजप विरोधात लोकांची नाराजी - शेट्टर

 Karnataka Election 2023 Live Updates :  कर्नाटकात सत्ता परिवर्तन होणार याच शंका नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते जगदीश शेट्टर यांनी मतदान केले. यावेळी ते म्हणाले, 'लोकांमध्ये भाजपविरोधात रोष आहे. मी नेहमीच या भागातील लोकांसाठी काम केले आहे. मी अनेकवेळा सांगितले आहे की, कोणतीही संस्था संविधानाच्या विरोधात असेल तर केंद्र सरकार त्यावर बंदी घालू शकते, ही शक्ती राज्य सरकारकडे नाही.

10 May 2023 11:52 AM

पहिल्या दोन तासात 8.26 टक्के मतदान 

 Karnataka Election 2023 Live Updates :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानाच्या पहिल्या दोन तासांत 8.26  टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उडुपी या किनारी जिल्ह्यात सर्वाधिक 13.28 टक्के मतदान झाले, तर चामराजनगर जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वात कमी 5.75 टक्के मतदान झाले. कर्नाटकातील 224 विधानसभा जागांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली, जी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

10 May 2023 10:26 AM

काँग्रेसला 141 जागा मिळतील - शिवकुमार

Karnataka Election 2023 Live Updates :  कर्नाटक काँग्रेसची सत्ता येणा आहे. राज्यात काँग्रेसला 141 जागा मिळतील, असा दावा प्रदेश अध्यक्ष डी.के. शिवकुमार रामनगरमध्ये केला आहे. 'मागील वेळी मोदीजींनी सर्व मतदारांना सांगितले होते की, मतदान करण्यापूर्वी तुमचा गॅस सिलिंडर बघा, नमस्कार करा आणि मग जा. यावेळी मी असेही म्हणेन की आमच्या पंतप्रधानांच्या विनंती आणि सल्ल्यानुसार गॅस सिलिंडरची किंमत पाहूनच मतदान करा, असा आवाहन केले आहे.

ते म्हणाले, 'आज मतदारांना मोठी संधी असून ते परिवर्तनासाठी मतदान करतील. ते प्रगतीशील, जागतिक आणि विकसित कर्नाटकासाठी मतदान करतील. मला खात्री आहे की ते परिवर्तनाला मतदान करतील आणि काँग्रेसला 141 जागा देतील. शिवकुमार म्हणाले, 'निर्मला सीतारामन या राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत, आधी त्यांना राज्याला मदत करु द्या. तिने एकदाही राज्याला मदत केली नाही आणि त्यांच्या कार्यकाळात प्रत्येकजण उपासमारीत आहेत. मला वाटते की त्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत.

10 May 2023 10:22 AM

कर्नाटकात भाजप सत्ता राखणार का ? या 10 जागांकडे लक्ष

Karnataka Election 2023 Live Updates : कर्नाटकात सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यावेळची कर्नाटक विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने रंजक बनली आहे. सत्ताधारी भाजपची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पक्षात मोठी बंडखोर झाल्यानंतर पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून विरोधात ठाकले आहेत. तसेच कर्नाटक सरकारमधील अनेक मंत्र्यांची थेट स्पर्धा काँग्रेस आणि जेडीएसच्या दिग्गजांशी आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकच्या राजकारणात अशा दहा जागा आहेत. त्याकडे लक्ष आहे. या 10 जागांमुळे सत्तेची राजकीय समीकरणे काय आहेत, ते जणून घ्या. तसेच  या निवडणुकीत जातीचे राजकारण महत्त्वाचे मानले जात आहे. लिंगायत आणि वोक्कलिगा घटक महत्त्वाचा फॅक्टरआहे. लिंगायत समाजाचा प्रभाव 67 जागांवर आणि वोक्कलिगा 48 जागांवर आहे. तर 82 जागांवर दलित मतदारांचे वर्चस्व आहे. 

कर्नाटकात या 10 जागांकडे लक्ष, हा घटक महत्त्वाचा फॅक्टर

10 May 2023 10:18 AM

काँग्रेसकडून सिलिंडरची पूजा, भाजपला आनंद

Karnataka Assembly Election 2023 Updates : काँग्रेस सिलिंडरची पूजा करत आहे याचा आनंद, असे वक्तव्य भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले आहे. बजरंग बलीची भूमी असलेल्या कर्नाटकातील जनता 13 मे रोजी प्रत्येक गोष्टीचे उत्तर देईल. काँग्रेसने अचानक सर्व गोष्टींची पूजा करण्यास सुरुवात केली आहे आणि आम्ही एलपीजी सिलिंडरची पूजा करणाऱ्या डीके शिवकुमार यांचे स्वागत करतो, आम्हाला आनंद आहे की काँग्रेस किमान एक प्रकारची पूजा करत आहे.

10 May 2023 10:15 AM

लग्नाआधी वधूने बजावला मतदान  

Karnataka Assembly Election 2023  Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत वधूने मतदान केले. चिक्कमगलुरु येथे मतदान सुरु आहे. मुदिगेरे बूथ क्रमांक 65, मकोनहल्ली येथे एका वधूने लग्नाआधी आपला मतदानाचा हक्क बजावला. ती येथील केंद्रावर दाखल झाली होती.

10 May 2023 10:13 AM

सुधा मूर्ती यांनी केले मतदान 

Karnataka Assembly Election 2023  Updates : लेखिका सुधा मूर्ती यांनी बेंगळुरुमधील जयनगरमध्ये मतदान केले. त्या म्हणाल्या, "मतदान करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. मतदान करणे हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे, कोणत्याही लोकशाहीत मतदार नसतील तर ती लोकशाही नसते, त्यामुळे मी सर्वांना मतदान करण्याची विनंती करते."

10 May 2023 08:35 AM

'काँग्रेसचा विजय होणार'
Karnataka Assembly Election 2023  Updates : कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खांद्रे यांनी बिदरच्या भालकी भागात मतदान केले. काँग्रेसचा विजय होईल, असा त्यांनी दावा केला आहे.

10 May 2023 08:32 AM

भाजपला बहुमत मिळेल - येडियुरप्पा
Karnataka Assembly Election 2023  Updates : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, 'भाजपला बुहमत मिळेल. मी कर्नाटकातील सर्व जनतेला लवकरात लवकर मतदान करण्याची विनंती करत आहे. मला खात्री आहे की ते भाजपला मतदान करतील. विजयेंद्र यांना 40 हजारांहून अधिक मते मिळतील आणि ते विजयी होतील. 

10 May 2023 08:29 AM

जातीय राजकारणाविरोधात मतदान - प्रकाश राज
Karnataka Assembly Election 2023  Updates :  बंगळुरुमध्ये मतदान केल्यानंतर अभिनेते प्रकाश राज म्हणाले, जातीय राजकारणाविरोधात मतदान करायचे आहे. निवडणूक ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपल्याला कर्नाटक सुंदर बनवायचे आहे. सुसंवाद राखावा लागेल.

10 May 2023 08:27 AM

अर्थमंत्री सीतारामन यांनी केले मतदान 
Karnataka Assembly Election 2023  Updates :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्या. बेंगळुरूमधील विजय नगर येथे त्यांनी मतदान केले.

10 May 2023 07:30 AM

संवेदनशील केंद्रांवर अधिक सुरक्षा व्यवस्था

Karnataka Assembly Election 2023  Updates :  1.5 लाख ईव्हीएम वापरण्यात येणार आहेत. कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा आहेत. यासाठी 2615 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी राज्यात 58 हजार 545 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, या ठिकाणी एकूण 5 कोटी 31 लाख 33 हजार 054 मतदार मतदान करणार आहेत.

या निवडणुकीसाठी एकूण 75 हजार 603 बॅलेट युनिट (BU), 70 हजार 300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76,202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी राज्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक ड्युटीसाठी शेजारील राज्यातून सुरक्षा दलांनाही राज्यात पाचारण करण्यात आले आहे. 

10 May 2023 07:29 AM

संवेदनशील केंद्रांवर अधिक सुरक्षा व्यवस्था

Karnataka Assembly Election 2023  Updates : कर्नाटकातील अत्यंत संवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही बसवलेत. यासोबतच तेथे सुरक्षा दलांची संख्याही वाढवण्यात आली आहे. 

10 May 2023 07:28 AM

Karnataka Assembly Election 2023  Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानापूर्वी  व्हिडिओ संदेश जारी केला. मतदानापूर्वी पीएम मोदींनी व्हिडिओ मेसेज जारी करत म्हटले की, 'कर्नाटकच्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्न हे माझे स्वप्न आहे. तुमचा संकल्प हाच माझा संकल्प आहे. जर आपण एकत्र आलो आणि आपले लक्ष एका ध्येयाकडे केंद्रित केले तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही.

10 May 2023 07:26 AM

काँग्रेसचे मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Karnataka Assembly Election 2023  Updates : काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडिओ संदेशाने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आयोगाला पाठवलेल्या तक्रारीत त्यांनी गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कथित आक्षेपार्ह विधानांचा मुद्दाही उपस्थित केला आहे. 

10 May 2023 07:23 AM

Karnataka Assembly Election 2023 Updates : कर्नाटक निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. 5 कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

Read More